□ तीन वेळा आंदोलन पुढे ढकलले : कर्मचारी संघटना
सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षा स्थगित झाल्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. महाविद्यालय व विद्यापीठात काम करणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी या परीक्षांवर बहिष्कार टाकला. त्यामुळे परीक्षा स्थगित झाल्या आहेत. Exams of three universities including Solapur postponed Solapur Kolhapur Mumbai students
विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर गुरुवारपासून (दि. २) परिक्षावर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार आंदोलनामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर २२ च्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या ५ वर्षापासून ३ वेळा आंदोलन पुढे ढकलले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ विद्यापीठासह कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सिटू चा जाहीर पाठिंबा
सोलापूर – राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रमुख ६ मागण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचारी बहिष्कार आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे कामकाज अचानक ठप्प झाले आहे. यामुळे परिक्षेची तयारी करूनही परिक्षा अचानक पुढे ढकलली गेल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेळेचे नियोजन चुकणार आहे. यास राज्य सरकार व प्रशासन जबाबदार आहे.
गेल्या ५ वर्षापासून वेळोवेळी आंदोलने करून ही शासनाने आश्र्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन होत असून याला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चा जाहीर पाठिंबा असून प्रशासन आणि शासनाच्या दिरंगाई मुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नुकसान तर झालेले आहेच त्याच बरोबर हजारोंच्या संख्येने परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. याला सर्वस्वी शासन जबाबदार व प्रशासन आहे.
यावर तातडीने आंदोलकांच्या न्याय हक्काच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. तर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान त्वरित थांबवावे अशा आशयाचे पत्रक सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चे महाराष्ट्र राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांनी प्रसिध्दीस दिले.
● या आहेत सहा मागण्या
१) सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा.
२) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.
३ ) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग
लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा.
४) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.
५) २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.
६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा
परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला नाइलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे, असे सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी कळविले आहे.
● लेखी नसल्यामुळे आंदोलन सुरू
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना एक महिन्यापूर्वी आंदोलनाचे निवेदन देऊनही त्यांनी आंदोलनाच्या एक दिवस अगोदर बुधवारी सायंकाळी महाविद्यालय व विद्यापीठ सेवक संयुक्त समितीची बैठक घेतली. या चर्चेत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत सुरु करण्याबाबत मंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री यांच्यासोबत चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्यात येईल असे स्पष्ट केले.
१ हजार ४१० कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल तसेच ५८ महिन्याच्या थकबाकी बाबत वित्त मंत्र्यांसोबत बोलून हा विषय तातडीने सोडवण्यात येईल, असे सांगण्यात आले. अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. परंतु लेखी आश्वासन नसल्यामुळे हे आंदोलन ०२ फेब्रुवारीपासून सुरू राहील, असे कृती समितीने जाहीर केले.