● घरफोडीतील ६१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Solapur. Lakhs of cash looted from merchant’s house; The driver who quit his job turned out to be a thief Pune investigation gold
● ड्रायव्हरला पुण्यातून घेतले ताब्यात
सोलापूर : व्यापाराच्या घरात ड्रायव्हर म्हणून नोकरीला आलेल्या नोकराने व्यापा-याच्या घरात सर्व काम करत संधीचा फायदा घेत चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
उमाकांत उर्फ बाबू यादव (वय-३०,रा. सुलेर जवळगे,ता. अक्कलकोट,जि. सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी ड्रायव्हरचे नाव आहे. याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने उमाकांत यादव याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, १ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण कसबा येथे राहणाऱ्या आशिष पद्माकर पाटोदेकर (वय-३०) यांच्या घरी झालेल्या जबरी घरफोडी झाली. यातील संशयित आरोपीस सोलापूर शहर गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत पुण्यातील सातारा रोडवरील हॉटेल उत्सव लॉज येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे,सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली रोख रक्कम रुपये ५० लाख ९० हजार ५०० आणि २१ तोळे सोन्याचे दागिने असा जवळपास ६१ लाख ४० हजार रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे.
पाटोदेकर कुटुंबीय घरगुती कामानिमित्त परगावी गेले होते. पाटोदेकर यांचे राहते घर तीन मजले असून, घराच्या कंपाउंडला लोखंडी गेट आहे. त्या कुलूप लावून व दोन्ही दरवाज्याचे कुलपाने बंद केले होते. पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम आहेत. त्याच्या चाव्या या तळमजल्यातील टीव्ही टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या होत्या. चोरी झाली तेव्हा मुख्य दरवाजाची दोन्ही कुलपे तसेच बेडरूमचे कुलूप हे तुटले नसल्याचे आढळले. त्यामुळे बनावट चावीने माहितगार व्यक्तीनेच ही चोरी केल्याचा संशय बळावला. त्या दृष्टीने पोलिस पथकाने २४ तासाच्या आत संशयित चोराला पकडले असल्याचे पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
चोरी करून तो मोटारसायकल वरून पुण्याला गेला होता. फिर्यादी मोठे व्यापारी असून त्याचा मोठा आर्थिक व्यवहार आहे. त्यांच्याकडे पाच सहा विविध प्रकारचे वेगवेगळ्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. त्यातील यादव याचे मालकाशी यांचे भांडण झाले होते व त्या भांडणाचा सूड घेण्याकरिताच संशयित आरोपीने ही चोरी केल्याची शक्यता पोलीस उपायुक्त काळे यांनी यावेळी व्यक्त केली. आरोपीस ७ दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या ताब्यातून रोख रक्कम व दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, नंदकिशोर सोळुंके,कृष्णात कोळी, महेश शिंदे, तात्यासाहेब पाटील, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, राजू मुदगल, कुमार शेळके, वसीम शेख, संतोष मोरे, निलोफर तांबोळी, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे, सुमित्रा बारबोले या पथकाने पार पडली.
》 चौकशीचा संशय बळावला उमाकांत अडकला
संशयित आरोपी उमाकांत यादव याचे शिक्षण बारावी झाले असून,तो गेल्या अडीच वर्षापासून पाटोदेकर यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांचे मालकाबरोबर भांडण झाले होते. घरफोडी केल्यानंतर तो पुण्याला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याने आपल्या इतर ड्रायव्हरकडे मालकासंदर्भात चौकशी करत होता. एकच माणूस मालकाबद्दल अनेकाकडे चौकशी करत असल्याने संशय बळावला आणि तो हाती लागला.