सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यानंतर त्यांचे नातू आ. रोहित पवार यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्या ‘राधाश्री’ निवासस्थावरच्या ‘लंच’ डिप्लोमासीमुळे वेगळ्या चर्चे ला उधाण आला आहे. Rohit Pawar’s ‘Lunch Diplomacy’ on ‘Radhashree’, Solapur Khote Parivar is hotly debated in political circles या बंद खोलीमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये झालेली लंच डिप्लोमासीमध्ये कोणती राजकीय खलबत्ते झाली? नेमकी कोठे यांच्याकडून पवारांनी कोणाता राजकीय आढावा घेतला? याची खमंग चर्चा सध्या राष्ट्रवादी वर्तुळात चालू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे आ. रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. सोमवारी (ता. 6 फेब्रुवारी) शहरामध्ये अचानक दौरा झाला. या दौऱ्यामध्ये पवारांनी युवकांशी संवाद साधला, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद असल्याने पार्क मैदानावर क्रिकेटचा आनंद घेतला. त्यानंतर नियोजित दौऱ्यामध्ये कुठलेही नियोजन नसताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना न देता मोजक्याच विश्वासू पदाधिकाऱ्यांना घेऊन रोहित पवारांनी थेट माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थान गाठले.
वास्तविक पाहता या भेटीला औपचारिक भेट असे गोंडस नाव दिले असले तरी या भेटीची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील पदाधिकाऱ्यांना देखील कुठलीच कल्पना नव्हती. या भेटीत आ. पवारांनी महेश कोठे यांच्याबरोबर बंद खोलीत सुमारे दीड तास चर्चा करत लंच घेतल्याने या ‘लंच डिप्लोमसी’ मध्ये नेमकं काय घडले? याची खमंग चर्चा सध्या राष्ट्रवादीमध्ये चालू आहे.
आ. रोहित पवार यांनी सध्या राज्यातील राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी विधानसभा तसेच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा राजकारणामध्ये वाढलेला सक्रिय सहभाग सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावयास लावणाऱ्या आहेत. त्यामध्ये महेश कोठे यांच्या खांद्यावर आगामी पालिका निवडणुकीची जबाबादारी दिल्याने आ. रोहित पवार यांच्या भेटीचे गुढ वाढले आहे.
राधाश्रीवर आलेल्या रोहित पवाराबरोबर राष्ट्रवादीचे नेते सुधीर खारटमल, बिजू प्रधाने, माजी महापौर यू.एन. बेरिया यांच्यासह कोठे परिवारातील माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे आणि कोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला पवारांनी शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कोठे परिवाराच्या वतीने रोहित पवार यांचा सत्कार करत स्वागत केले. त्यानंतर बंद खोलीत राजकीय खलबत्ते झाली. आगामी पालिका आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात पवारांनी महेश कोठे यांच्याकडून कानोसा घेतला. कोठे यांनी पवारांना नेमके काय सांगितले? याबाबत कमालीची गुप्तता राखली आहे.
यासंदर्भात महेश कोठे यांना विचारणा केली असता माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचा विवाह समारंभाला रोहित पवार यांना उपस्थित राहता आले नाही त्यामुळे ते प्रथमेश कोठे यांना भेटण्यासाठी आले होते. यापूर्वी सुध्दा त्यांचा दौरा नियोजित होता त्यावेळी सुध्दा त्यांनी विचारणा केली होती. मात्र प्रथमेश कोठे परगावी असल्याने त्यांची भेट झाली नाही. सोमवारी त्यांनी राधाश्री निवासस्थानी येऊन कोठे परिवाराची भेट घेतली. शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेऊन प्रथमेश कोठे यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरात रणजी क्रिकेट सामन्यांसाठी करणार प्रयत्न, टेनीस क्रिकेटसाठी स्वतंत्र मैदानाची गरज : एमसीए अध्यक्ष रोहित पवार
सोलापूर : सोलापुरात आंतराष्ट्रीय स्टेडिअम पूर्ण झाले आहे. या मैदानावर क्रिकेटचे रणजी सामने व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे मैदान व मैदानावरील खेळपट्टी व्यवस्थित राहण्यासाठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटसाठी स्वतंत्र मैदानाची आवश्यकता आहे. महापालिकेने प्रस्ताव दिल्यास सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटसाठी स्वतंत्र मैदान केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली.
सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर अध्यक्ष रोहित पवार यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. आमदार पवार म्हणाले, सोलापुरातील इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय स्टेडिअमवर प्रेक्षक बसण्याची क्षमता कमी आहे. ही क्षमता वाढवावी लागेल. महिलांचे क्रिकेट सामने, महिला क्रिकेटपटूंचे प्रशिक्षण यासाठी हे स्टेडिअम उपयोगात आणता येईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महत्वाच्या समित्यांमध्ये सोलापू्र जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. ११ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
आमदार पवार म्हणाले, सोलापुरात विमानसेवा नाही म्हणून आयटी कंपन्या येत नाहीत हे अर्धसत्य आहे. आयटी कंपन्या न येण्याची इतरही कारणे आहेत. होटगी रोडवरील विमानतळ लहान आहे. त्या ऐवजी बोरामणी येथे मोठे विमानतळ होत आहे. मोठ्या विमानतळाला प्राधान्य दिले पाहिजे. सिध्देश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून सहाशे ते सातशे कोटी रुपयांची उलाढाल होते. हा कारखाना बंद करून लहान विमानतळ करण्यात काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
□ भाजपकडून महाराष्ट्राचा अवमान
भाजपकडून महाराष्ट्रावर अन्याय
गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रातील उद्योग तिकडे नेले, कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचा अवमान केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही सुशांत सिंग प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी केली. भाजप महाराष्ट्राची बदनामी करत आहे, भाजप महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालत आहे असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. महाराष्ट्रावर होत असलेला हा अन्याय महाराष्ट्रातील जनता पहात आहे. महाराष्ट्राच्या आगामी निवडणूकीत राज्यातील जनता भाजपला धडा शिकवेल असा विश्वासही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.