□ हंगाम अंतिम टप्प्यावर तरी ७८६.६९ कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत
सोलापूर : सोलापूर विभागातील ५० साखर कारखान्यांकडून यंदाच्या हंगामातील ३१ जानेवारीपर्यंतचे ‘एफआरपी’चे बेसिक रिकव्हरीप्रमाणे २८३०.८० कोटी रुपये रक्कम ऊसबिलाच्या स्वरुपात शेतकऱ्यांना मिळाले. Farmers deprived of right ‘FRP’; At the beginning, the aggressive farmers organization Mawal Osmanabad Solapur पण यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला, तरी शेतकऱ्यांना एफआरपी मिळू शकलेली नाही. यंदाच्या हंगामातील आतापर्यंत ७८६.६९ कोटी रुपये एफआरपीचे कारखान्यांकडे थकीत आहेत.
यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३७ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ अशा एकूण ५० कारखान्यांनी विभागात गाळप हंगाम घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे २२४०.०३ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ५९०.७७ कोटी रुपये जानेवारीअखेर दिले आहेत.
असे असले तरीही सोलापूर जिल्ह्यातील २९ कारखान्यांकडे एफआरपीचे ६९६.९१ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ कारखान्यांकडे ८९.७८ कोटी रुपये थकीत आहेत.
गळीत हंगामाच्या सुरुवातीस आक्रमक होत ‘कोण म्हणतो देत नाय…घामाचा दाम घेतल्या शिवाय राहत नाय’.. अश्या घोषणा देत आंदोलनाचे इशारे देणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना या थकित एफआरपी साठी ‘ब्र’ शब्द काढताना दिसत नसूनही मवाळ झाल्या असल्याचे चित्र आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने अनेक कारखान्यांनी ऊसाची पळवापळवी करीत ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धावपळ करीत असताना कारखानदारांमध्ये ऊस दराची स्पर्धा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, तसे न होता उलट थकीत एफआरपी वाढतच गेली आहे. त्यातच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. या थकीत एफआरपी शेतकऱ्यांना मिळाव्यात, अशी मागणी ऊस उत्पादकातून केली जात आहे.
》 ‘एफआरपी’साठी नियमावली करणे गरजेचे
पुढील हंगाम चालू व्हायची वेळ आली तरीही एफआरपीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. साखर आयुक्तालयाने पंधरवड्याचा एफआरपी अहवाल घेताना कारखान्यांसाठी नियमावली तयार करून त्यासाठी यंत्रणा उभारायला हवी.
कारखान्यांनी प्रत्येक पंधरवड्यात ऊसबिलाच्या याद्या बँकांना देऊन त्या बँकांकडून प्रमाणित करून घेण्याचे बंधन घालायला हवे, अशा प्रमाणित केलेल्या याद्याच साखर आयुक्तालयाने स्वीकारायला हव्यात.
जेणेकरून कारखान्यांनी प्रत्येक पंधरवड्यात दिलेली एफआरपी व थकीत एफआरपीचा वस्तुनिष्ठ आकडा समोर येईल व शेतकऱ्यांना वेळच्यावेळी एफआरपी मिळेल.
》 कारखानानिहाय ३१ जानेवारीअखेर थकीत एफआरपी (कोटी रुपयांत)
☆ सोलापूर जिल्हा :
सिद्धेश्वर-२५.३२, संत दामाजी-१३.१०, श्री मकाई-२०.२९, संत कुर्मदास-१३.१०, सासवड माळी-१५.०, लोकमंगल (बीबीदारफळ)-८.३८, लोकमंगल (भंडारकवठे)-२३.६३, सिद्धनाथ-४९.२१, जकराया-१४.०८, इंद्रेश्वर-१२.५३, भैरवनाथ (विहाळ)-३३.१६, भैरवनाथ (लवंगी)-३५.४३, युटोपियन-२८.८४, मातोश्री शुगर-१९.२९, भैरवनाथ (आलेगाव)-१९.४३, बबनरावजी शिंदे- १३.६७, ओंकार-०.३२, जयहिंद-१४.३७, विठ्ठल रिफाइंड-४१.६२, आष्टी शुगर-९.४६, भीमा-४८.०३, सहकार शिरोमणी-३६.२६, सीताराम महाराज-२.४२, धाराशिव (सांगोला)-१५.५३, श्री शंकर-३१.७१, आवताडे शुगर्स-२४.०७, विठ्ठल (गुरसाळे)-५५.९१, येडेश्वरी-४.९०.
☆ उस्मानाबाद जिल्हा :
विठ्ठलसाई-१४.१४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-२.३१, भैरवनाथ (वाशी)-१०.६७, धाराशिव (कळंब)-१३.७०, भैरवनाथ (सोनारी)-२५.७३, लोकमंगल माऊली-१९.४४, क्यूनर्जी-२.८८, डीडीएनएसएफए-०.९१.