○ सुशीलकुमार शिंदे – जयंत पाटील यांच्यात बंद खोलीत चर्चा
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांचे उणे- दुणे काढण्याचे प्रकार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची बंद | दाराआड झाली. Seniors met in the dark night, juniors lit the day light Sushil Kumar Shinde Jayant Patil closed room discussion at night Solapur politics
या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नसली तरी राजकीय गोष्टी झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे-पाटील यांच्यात | बंद खोलीत चर्चा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी रात्री सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीची आढावा बैठक घेतली. ते पुढे जाताना त्यांना सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी चहाचे आमंत्रण दिले.
जयंत पाटील यांनीही त्यांचे आमंत्रण स्विकारत निवासस्थान गाठले. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. या दरम्यान कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. पाटील बाहेर आल्यानंतर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांची गाठ घेत हातमिळवणी केली.
○ पाटलांना सहज चहाचे आमंत्रण दिले : शिंदे
जयंवतराव पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली होती, त्यावरुन त्यांना सहज चहाला बोलावले. या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची निवडणूक एकत्रीत लढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर मग कोणती जागा कोणाला सोडायची हा विषय येतो. सध्या कोणी कोणाला जागा सोडायची हा विषय नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
○ राजकीय चर्चा झाली नाही : जयंत पाटील
सोलापूर दौऱ्यावर होतो. सुशीलकुमार शिंदे यांचे चहाचे निमंत्रण होते. त्यामुळे चहासाठी गेलो. त्यांच्यासोबत सहज गप्पा मारल्या. बैठकीदरम्यमान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सोलापूर लोकसभेची जागा सोडण्याचा विषय हा श्रेष्ठींच्या स्तरावरचा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 प्रणितीताईंच्या प्रश्नाने काँग्रेस-राष्ट्रवादीवाले भिडले
कोण रोहित पवार ? – आमदार प्रणिती शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणजे शरद पवार. दुस-या अर्थाने राष्ट्रवादीची पॉवरबँक म्हणजे बारामतीचे पवार कुटुंब. कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार म्हणजे याच पॉवरफुल्ल घराण्याचे सदस्य. त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादीकडून मागणी होऊ शकते; असे विधान केल्याप्रकरणी सोलापूर शहर मध्यमधील काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा कोण रोहित पवार ? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून त्यांनी वादाला तोंड फोडले आणि दोन्ही काँग्रेसवाले एकमेकांना भिडले.
तत्पूर्वी म्हणजे आदल्याच दिवशी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. त्यानंतर उगवलेल्या सकाळी दोन्ही काँग्रेसमधील कनिष्ठ वादावादीने पेटले असल्याचे चित्र शुक्रवारी सोलापुरात पाहण्यास मिळाले.
दोन दिवसांपूर्वी आ. रोहित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी होऊ शकते, असे विधान केले होते. त्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी थेट बारामती मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची उलट मागणी केली होती. त्यावरून सोलापुरातील दोन्ही काँग्रेसमध्ये वादावादी सुरू झालेली असतानाच शुक्रवारी या मार्गे राष्ट्रवादीकडे वाटचाल करणारे माजी महापौर महेश कोठे यांनी शहराध्यक्ष नरोटे यांची बारामती मतदारसंघाची मागणी शिंदे कुटुंबीयांना अडचणीची ठरणारी आहे, असे वक्तव्य केल्यानंतर काही मिनिटातच आ. प्रणितीताई शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना ‘कोण रोहित पवार?’ असा प्रश्न उपस्थित केला आणि वाद भडकला. त्यानंतर दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी तोंडसुख घेत एकमेकांना भिडले.
काँग्रेस – राष्ट्रवादीतील घोषणाबाजीसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
● क्रिया-प्रतिक्रिया
प्रणितीताईंच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी काँग्रेस भवन येथे आ. रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांचा एकत्र फोटो लावून घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर युवक काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले, बाबा करगुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाजवळ आ. प्रणिती शिंदे यांचे भले मोठे बॅनर लावत आता कस वटतय गॉड गॉड वाटतय का? असा सवाल करत राष्ट्रवादीला डिवचले.
● काय म्हणाल्या प्रणितीताई ?
माजी महापौर कोठे यांचे विधान झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच प्रणितीताई माध्यमांसमोर बोलत्या झाल्या. आ. रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यावर आपले म्हणणे काय ? असा प्रश्न माध्यमांनी विचारताच ‘कोण रोहित पवार?’ असा तात्काळ उलट प्रश्न उपस्थित केला. त्यांची पहिली टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवसांनी त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल’, असा टोमणा मारून सुरू असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी वादाला नव्याने फोडणी टाकली.
● राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रसिद्धीसाठी केलेली काँग्रेसभवनसमोरील स्टंटबाजी महागात पडेल. उद्या जरी महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या; तर जुबेर बागवान व प्रशांत बाबर यांचे डिपॉझिट जप्त होईल; असे हे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्ही मनावर घेणार नाही. अशा या । आंदोलनामुळे काँग्रेस पक्षाचे नुकसान होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसलाच याचा फटका बसेल.
गणेश डोंगरे (शहर अध्यक्ष- सोलापूर युवक काँग्रेस)
□ काय म्हणाले होते रोहित पवार ?
दोन दिवसांपूर्वी आ. रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की दोन्ही काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. याठिकाणी सलग दोनवेळा काँग्रेसचा पराभव झाला आहे.
शिवाय सुशीलकुमार शिंदे यांनी पुढील निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून मागणी होऊ शकते. या विधानानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघच काँग्रेसला सोडावा, अशी उलट मागणी केली होती.
¤ आमदार झाल्यानंतर आ. शिंदे यांनी काँग्रेसबरोबरच महेश कोठे, सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, बाळासाहेब शेळके, स्व. आनंदराव देवकते यांची घराणी संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. आता त्या दुजोरा मिळत आहे. त्यांना भाजपमध्ये जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे. परंतु त्याची बंदूक राष्ट्रवादी पक्षावर ठेवू नये.
• प्रशांत बाबर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस) –
○ काय म्हणाले महेश कोठे ?
सुशीलकुमार शिंदे अडचणीत येतील, अशी वक्तव्य शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी टाळावीत, बारामतीला चॅलेंज करणे बारामतीला नव्हे तर सुशीलकुमार यांनाच अवघड जाऊ शकते, असा इशारा माजी महापौर महेश कोठे यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना दिला.
कोठे म्हणाले, शहर काँग्रेस अध्यक्षांनी मर्यादित अधिकार असताना आपल्या मर्यादेतच बोलावे. ते शहर अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष नाहीत याचे भान ठेवावे. लोकसभेच्या निवडणुकांचे जागावाटप किंवा उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. विनाकारण काहीतरी बोलायचे आणि आघाडीमध्ये वितुष्ट वाढवायचे काम चेतन नरोटे यांनी केले आहे. खरे तर हा विषय काँग्रेस पक्षानेच सुरू केला. आरिफ शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही लोकसभा लढवा, असे सांगितले.
अर्थात आरिफ शेख यांचे हे वक्तव्य सहजपणे आणि चेष्टेत होते. त्याचे एवढे गांभीर्य घेण्यापेक्षा चेतन नरोटे यांनी आरिफ शेख यांचे हे वैयक्तिक वक्तव्य आहे, असे सांगून विषयावर पडदा टाकायला हवा होता. चेतन नरोटे यांनी विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेसह अनेक निवडणुका एकत्रित लढवायच्या आहेत. अजूनही लोकसभेच्या सोलापूर जागेविषयीचा प्रदेश किंवा केंद्रीय पातळीवर कोणताच निर्णय झालेला नाही, मग ही घाई का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.