○ महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाची कारवाई !
○ जानेवारीत विविध प्रकारच्या कारवाईत 1.10 लाख रुपयाचा दंड वसूल !
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध प्रकारचे 9 नियम न पळल्याने जानेवारी महिन्यात एकूण 310 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. Punitive action against 120 people who do not segregate waste! Solapur Municipality त्यांच्याकडून एकूण 1 लाख 10 हजार 200 रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण न केल्याने या महिनाभरात 120 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 अखेर विविध प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य निरीक्षकांमार्फत ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध प्रकारचे 9 स्वच्छतेचे नियम न पाळल्याने महापालिका प्रशासनाकडून नियमित ही कारवाई करण्यात येते. या अंतर्गत प्लास्टिक व थर्माकोल प्रकरणी 4 जणांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कचरा विलगीकरण न केल्याने 120 जणांविरुद्ध कारवाई करत त्यांच्याकडून 25 हजार 100 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करणे बाबत 153 जणांवर कारवाई केली असून 23 हजार 100 रुपये दंड वसूल केला आहे. बायोमेडिकल वेस्ट संदर्भात 3 जणांकडून 15 हजार रुपये दंड जमा केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने 12 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1200 रुपये दंडही वसूल केला आहे.
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणे व विलगीकरण न करणे या संदर्भात 8 जणांवर कारवाई करून 24 हजार रुपये दंड जमा केला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघु शंका केल्याने 8 जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांना 800 रुपये दंड करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी शौच केल्याने एका जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी एका विरुद्ध कारवाई करून पाचशे रुपये दंड जमा केला आहे.
शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावे असे आवाहन मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरातील होटगी तलाव सुशोभिकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील होटगी येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Punitive action against 120 people who do not segregate waste! Solapur Municipality याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले आहे. त्यामुळे आता लवकरच होटगी तलाव हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
होटगी हे सोलापूर शहराच्या हद्दीस लागून आहे. जलसंपदा विभागाच्या मालकीचा तलाव असून तलावाच्या परिसरात ६० ते ७० वर्षापूर्वी बांधलेली ब्रिटीशकालीन विश्रामगृहाची सुंदर इमारत आहे. परिसराच्या आसपास राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र, अनेक नामवंत सिमेंट उत्पादक कंपन्या आहेत. औद्योगिक विकासही वाढत आहे. हे ठिकाण उत्तम दळणवळणाच्या सुविधांनी जोडलेले आहे.
तलावाचा विस्तीर्ण जलाशय आहे. शहरातील नागरीकांना व परिसरातील पर्यटकांना विश्रामगृहाची सुधारणा करून विश्रांती स्थळ, मोकळ्या जागेत बगीचा, बैठक व्यवस्था, चौकिंग ट्रॅक, पॅगोडा, तलावात नौकाविहार, दिवा बत्ती, साहसी खेळ पार्क उभारणी सोलर पॅनल उभारणी होऊ शकते अशी संकल्पना आमदार सुभाष देशमुख यांची होती.
यासाठी त्यांनी पर्यटन विभागाकडे होटगी तलावाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावाही केला होता अखेर त्याला यश आले असून पर्यटन विभागाने हा निधी मंजूर केला आह. त्यामुळे आता होटगी तलाव हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार असून येथे विविध सुविधाही उपलब्ध होणार आहेत.