सोलापूर : मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांना सेक्सटोर्शनच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका आरोपीने त्यांना व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवले तसेच अश्लील व्हिडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. Attempt to trap MLA of Solapur in sextortion, accused arrested Pune Yashwant Mane
आरोपीने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कॉल माने यांना पाठवून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची मागणीही केली. याप्रकरणी आमदार माने यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून आरोपीला अटक केली आहे.
काही महिन्यांपूर्वी सेक्सटॉर्शनच्या घटनेने पुणे हादरलं होतं. या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने या घटनेचा खुलासा झाला. यानंतर वर्ध्यातील एका डॉक्टरकडूनही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून लाखोंची खंडणी उकळली गेली. चंद्रपुरातही काही तरुणांनावर आत्महत्येचा विचार करण्याची वेळ आली. मात्र, आता या गुन्हेगारांनी आपला मोर्चा आता लोकप्रतिनिधींकडे वळवल्याचं दिसत आहे. सोलापूर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने सेक्सटोर्शनचे बळी ठरले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://surajyadigital.com
याविषयी अधिक बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले “मी कुठल्या ही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ 70-80 मेसेज करण्यात आले होते. तसेच 1 लाख रुपयांची खंडणी मला मागितली होती. यामुळे ही तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती,”
आमदार माने यांनी पुण्यात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकांचा तपास सुरु काढत त्याचा माग काढला. तपासात हा फोन नंबर राजस्थानमधील असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी एक पथक राजस्थानला पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थान मधील भरतपूर या जिल्ह्यात तब्बल 7 दिवस तळ ठोकला होता. यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले.
आमदार यशवंत माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर मिळवून त्यांच्याशी व्हाट्सअपवर संपर्क साधण्यात आला. वेळोवेळी अश्लील संदेश पाठवले तसेच अश्लील व्हीडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. कॉल रेकॉर्ड करून यांचे फेसबुकवर असलेले मित्र यांना पाठविण्याच्या धमकी देऊन 1 लाख रुपये इतक्या रकमेच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. तसेच अश्लील व्हीडीओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
या गुन्ह्यातील आरोपीने वापरलेल्या मोबाइलवरून आरोपी भरतपूर राज्यस्थान येथील असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी शोध घेत आरोपी रिझवान अस्लम खान याला ताब्यात घेतलं आहे.
आरोपीकडून 4 मोबाईल संच व 4 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या मोबाईल संचामध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेल्या 90 अश्लील व्हिडीओ क्लिप्स मिळाल्या आहेत. आरोपीला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. काय आहे सेक्स्टॉर्शनचं जाळं? तरुण आणि धनाढ्य व्यक्तींना गाठून फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते.
या टोळीतल्या तरुणींना अश्लील बोलायला तयार केलेलं असतं. वेगवेगळ्या नंबरवरुन हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावले जातात. ज्याला जाळ्यात ओढायचं त्याला बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंग केलं जात आणि त्यानंतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचे नाव रिझवान खान (24) असून तो राजस्थान मधील आहे. आरोपी खान याने आत्तापर्यंत 80 जणांना असे फोन केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून आत्तापर्यंत 4 मोबाईल जप्त केले आहेत.