सोलापूर : खून प्रकरणी १६ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दि.१७ जुन २०१८ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी येथील टोल नाक्याजवळ पूर्वैमनस्यातून हा प्रकार घडला होता. Madha | Sixteen acquitted in Kurduwadi murder case Solapur Court News
पूर्ववैमनस्यातून विकी विष्णू गायकवाड याचा तलवार, कोयता, लोखंडी रॉडने मारून खून केला. या खून केल्याच्या आरोपावरून माणिक श्रीरामे यांच्यासह १६ जणांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयात झाली. सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या खटल्याची हकीकत अशी की, मयत विकी गायकवाड व आरोपींमध्ये पूर्वी झालेल्या भांडणामुळे वैमानस्य होते. घटनेदिवशी विकी गायकवाड हा कारमधून बार्शी कुर्डूवाडी बायपास रस्त्याने सोलापूरकडे जात असताना टोल नाक्याजवळ आरोपींनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केल्याच्या आरोपावरून माणिक श्रीरामे,आकाश राजगे, विनोद सोनवणे,अनंतराव सोनवणे,आकाश श्रीरामे,अर्जुन श्रीरामे,अक्रम खान,विशाल शिंदे,करण वाल्मिकी,सागर कापुरे,किशोर ढवळे,महादेव गायकवाड,राहुल बनसोडे, बाळू गायकवाड,राजेश उबाळे,फारुख खान अशा १६ आरोपींच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल करण्यात आले होते.
माढा तालुक्यात गाजलेल्या या खटल्यात आरोपी क्रमांक १ ते ७ तर्फे ॲड.धनंजय माने,ॲड.जयदीप माने, ॲड.विकास मोटे, ॲड.शरद झालटे तर आरोपी क्रमांक ८ ते १६ तर्फे ॲड. महेश जगताप (बार्शी) यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, एक जखमी तर एकाचा दुर्दैवी मृत्यू
सांगोला : शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ही पोलिसांची गाडी होती. यात एका बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही दुखापत झाली नाही. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथील एका कार्यक्रमात हजेरी लावून शहाजीबापू परत जात असताना सांगोला तालुक्यातील माळवाडी- नाझरा येथे ही दुर्घटना घडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या स्कार्पिओ गाडी (क्रमांक एमएच १३, डी एम ९४४०) ला मोटरसायकल (क्रमांक एमएच ४५ ए जे ६३३० ) चा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार अशोक नाना वाघमारे (वय ५० वर्षे रा. माडगुळे ता. आटपाटी जि. सांगली) हा जागीच ठार झाला आहे. नानासाहेब बिरा आमुने (वय ४० वर्षे रा. एखतपुर ता. सांगोला. जि.सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे.
आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की , काय झाडी काय डोंगर काय हाटील फेम आमदार शहाजीबापू पाटील हे नाझरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम आटोपून ते सांगोल्याकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांची संरक्षक गाडी होती नाझरा ते नाझरामठ या रस्त्यावर बोराटे वाडी येथे आज गुरूवारी ( ९ फेब्रुवारी) रोजी साडेचारच्या सुमारास मयत अशोक वाघमारे व नानासो आमुने हे मोटर सायकलवरून माडगुळे कडे चालले होते.
आमदार पाटील यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीला मोटर सायकल धडकली. अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीने पोलिसांच्या गाडीला समोरून जोराची धडक दिल्याने एकाचा तडफडून मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी भेट दिल्याची माहिती आहे.