सोलापूर : एखाद्या चित्रपटातील अपहरण नाट्याला साजेशी थरारक घटना बुधवारी (ता. 8) सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या डोमिनोज पिझ्झा समोर घडली. या अपहरणनाट्यात ज्याचं अपहरण करण्याचा ‘विडा’ ज्या टोळीने उचलला होता, ती ‘पुणेरी’ टोळी असून,संपूर्ण टीम गजाआड करण्यात सदर बझार पोलिसांना यश आले आहे. The plot to kidnap the youth failed, the Puneri gang of eleven people including seven women were remanded in police custody
या पुणेरी टोळीत ७ महिला व ४ पुरुषांचा सहभाग असून, या ११ संशयित आरोपींना मुख्य न्याय दंडाधिकारी भंडारे यांच्या न्यायालयासमोर उभ केले असता, त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचे झाले असे की, पुण्यातून ७ महिला ४ पुरुष अशी टोळी सोलापुरात येते आणि एका तरुणावर पाळत ठेवून त्याचे अपहरण करण्याचे ठरवतात आणि त्यातच त्यांचा अपहरण करण्याचा डाव फसतो.
शहरातील गजबजलेल्या सात रस्ता भागात डॉमिनोज पिझ्झाच्या खाली आकाश नामदेव काळे (वय-२८,रा. दक्षिण कसबा,चौपाड, सोलापूर) हा ठेकेदार असून,नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रासोबत दुचाकीवर त्याच्या कार्यालयात आला. कार्यालयातून काम संपवून बाहेर पडत असताना त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या महिलांनी त्याला घेरलं. त्याचवेळी दोन महिला त्याच्या मागून येऊन तु माझी छेड काढतो का तू मला धक्का मारून अंगावर येतोस का असे म्हणत त्याला मारहाण करत तोंड दाबून इतर महिलांच्या साथीने आकाश याला (एम.एच.१३. ए. झेड. ४२३१ ) या स्विफ्ट डिझायर कार मध्ये जबरदस्तीने घातले.
त्याचे तोंड दाबत त्याला कारमध्ये मारहाण करत भरधाव वेगाने कार रंगभवन मार्गे बेगम पेठच्या दिशेने जात होती. त्यावेळी आकाश याचा मित्राने दुचाकीवरून त्या स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग करून त्याने कारच्या समोर त्याची दुचाकी लावली. लगेचच आकाशच्या मित्राने त्या कारची चावी काढून घेतली. बेगम पेठ पोलीस चौकीच्या परिसरात गर्दी झाल्याने तेथे त्याच वेळेस पोलीस आले. पोलिसांना देखील त्या महिलांनी शिवीगाळ करत अरेरावीची भाषा वापरत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना सर्व प्रकार समजल्यानंतर अतिरिक्त कुमक मागवुन त्या महिलांना त्यांनी ताब्यात घेऊन सदर बझार पोलिस ठाण्यात नेले.
● हे आहेत पुणेरी टोळीतील आरोपी
पल्लवी रवि गाडे (वय-२७,रा.गल्ली नं.१०.दत्त मंदीर शेजारी,चिचेवाडी गावठाण,पुणे) , प्रिया काशिनाथ गायकवाड, (वय-३०,रा. काळेपडळ, सय्यद नगर, गल्ली क्र.४,पुणे,सोना विकी पाटोळे, (वय-२९,रा. पाण्याची खाण,रामटेकडी, हडपसर, पुणे) कलावती मनोज गायकवाड (वय-३२,रा. गल्ली नं.३६, साई बाबा मंदीर, शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, पुणे, रोहिणी दत्ता शिंदे,(वय-२४,रा. गल्ली नं.९ , सीएनजी पंपामागे, कोथरुड,पुणे,काजल विजय शिंदे, (वय-२५, रा. गल्ली नं.१, गोधळे नगर, हडपसर,पुणे, विद्या सदाशिव पाटोळे,(वय-३४ रा.गल्ली नं.२४.सेंटर मॉलजवळ, सरस्वती पाटी,पुणे,अजय मोहन वाघमारे,(वय-२५,रा. तुळजाई माता वसाहत, नवग्रह मंदिर गल्ली नं.७८ सहकार नगर पद्मावती पुणे-९) , सुनिल विश्वनाथ कांबळे,(वय-४०, रा.आंबेगांव पठार, राम मंदिरचे पाठीमागे ता.हवेली जि.पुणे),शंकर गणपत गवळी, (वय-३०,रा. बेकराई नगर,मारुती मंदिर जवळ हडपसर पुणे) योगेश सदाशिव कोलते,(वय-२६, रा. पी.एम.टी.बस स्टॉप शेजारी, खालची आळी महालक्ष्मी मंदिरचे शेजारी पितरवे ता. पुरंदर जि.पुणे) असे आहेत पुणेरी टोळीतील आरोपींची नावे.
● अन्…… अधिकाऱ्याची नेमप्लेट तुटली
कारमधून बाहेर उतरलेल्या महिलांनी बेगम पेठ येथील एका अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत अंगावर धावून आल्या व तेथील असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर देखील हात उचलला. त्यानंतर तेथील जमलेल्या पोलिसांच्या अंगावर धावून, या झटापटीत एका अधिकाऱ्याच्या अंगावर असणाऱ्या ड्रेसवरील असणारी त्यांच्या नावाची नेमप्लेट तुटल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर ते महिला आमची ओळख तुम्हाला माहित नाही, आमच तुम्ही काहीच करू शकत नाही, असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पोलीस ठाण्यात महिलांना मिळाला ‘प्रसाद’
संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात देखील गोंधळ घालून जोरजोरात अधिकाऱ्यांवर ओरडत होते. आकाश काळे याचे अपहरण का व कशासाठी केले. हे पोलीस विचारात असताना त्यांनी आपले तोंड तेव्हा उघडले नाही व मुख्याची भूमिका दर्शवली. दरम्यान पोलिसांनी त्यांना चांगल्याच प्रकारे त्यांना खाक्या दाखवत प्रसादही दिला. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती न देता व हे अपहरण कुणासाठी व कुणाच्या सांगण्यावरून केले हे देखील सांगितले नाही. परंतु आपली ओळख खूप मोठी आहे, असे म्हणत पुण्यातील एका राजकीय नेत्याला कॉल लावून सुद्धा दिला असल्याचे सांगितले जात आहे.
● करायचे होते एकाचे अपहरण; अंगलट आले दुसऱ्याचेच प्रकरण
ज्या तरुणाच्या अपहरणासाठी पुण्याहून आलेली ही टोळी गेल्या दोन दिवसांपासून त्या परिसरात त्यांना ज्या तरुणाचं अपहरण करायचं होतं, त्याच्या पळतीवर होते. त्यांना आकाश काळे याचा चेहरा त्या तरुणाचा चेहरा मिळता – जुळता दिसल्याने आकाशला कारमध्ये कोंबून काम फत्ते झाल्याच्या हर्षाने सुसाट निघाले होते, मात्र बेगमपेठेत घडलेल्या तमाशामुळे हे प्रकरण पोलीसांपर्यत अन् गुन्हा दाखल होण्यापर्यंत लांबत गेले.
या प्रदीर्घ नाट्यात ज्याचं अपहरण करण्याच्या उद्देशाने ही पुणेरी टोळी आली होती, कारण या टोळीला करायचे होते एकाचे अपहरण आणि अंगलट आले दुसऱ्याचेच प्रकरण. असे आकाशच्या मित्राने बोलताना सांगितले. त्यांना अपेक्षित असलेला तरूण दुसरा होता, हेही चौकशीत पुढं येणार आहे.
● अपहरणाचा मूळ हेतू अद्याप ‘गुलदस्त्यात’
यातील प्रकरणातील सात महिला या दोन दिवसापूर्वी रेल्वेने सोलापुरात आल्या आणि इतर त्यांच्या टोळी मधील चार पुरुषांच्या मदतीने मार्केट यार्ड परिसरातील एका लॉजवर त्यांनी मुक्काम केल्याचाही पोलिसांकडून सांगितलं जात आहे. गेल्या २४ तासात झालेल्या चौकशीत, ज्याचे अपहरण करण्यासाठी टोळी गेल्या २ दिवसांपासून ‘पाळती’ वर होती, त्यांनी चेहरा साधर्म्यामुळे दुसऱ्याला उचलल्याने फसल्याचे पुढे आले, परंतु अपहरणाचा मूळ हेतू अद्याप गुलदस्त्यातच आहे. पुढील तपास सुरू असल्याचे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांनी ‘सुराज्य’शी बोलताना सांगितले.
● मित्राच्या समयसूचकतेमुळे फसले नाट्य !
सात रस्ता परिसरातील डोमिनोज पिझ्झासमोर पार्कीगमध्ये मित्रांशी बोलत थांबलेल्या एका तरुणास, माझ्या मुलीस छेडतोस का, असे जाब विचारात एका महिलेने वादास प्रारंभ केला. हा वाद या अपहरण नाट्याचे निमित्त होते. या महिलेसह इतर महिलांनी बळजबरीने कारमध्ये कोंबले अन् या अपहरण नाट्याचा प्रारंभ झाला. दिवसाढवळ्या दुपारच्या साडेबारा वाजता सुसाट निघालेली कार रंगभवनमार्गे बेगमपेठ मार्गे विजापूर वेसकडे निघाली होती, त्यास ब्रेक लागला तो त्या तरुणाच्या मित्राने, त्या सुसाट कारसमोर आडव्या लावलेल्या दुचाकीमुळे !