○ सोलापूरच्या महाआघाडीत बिघाडीचे संकेत
● आमदार प्रणिती शिंदे यांनी उडवली रोहित पवार यांची खिल्ली
सोलापूर : सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी या मागणीसाठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. Who is Rohit Pawar? There is childishness in many…: MLA Praniti Shinde Mahavikas Aghadi failure signal राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सर्वप्रथम ही मागणी केली त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान लोकसभेची जागा राष्ट्रवादी मागत असल्याने काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी काँग्रेसच्या तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे यांची या प्रकरणात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी रोखठोक उत्तर देताना थेट कोण रोहित पवार? असा सवाल माध्यमांसमोर केला. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे, त्यामुळे पोरकटपणा असतो काही जणांच्यामध्ये असे म्हणून त्यांनी पवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काल गुरुवारी रात्रीच माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी थांबले होते. असे असतानाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य महाआघाडीत बिघाडी होणार असल्याचे संकेत देत आहे.
आमदार प्रणिती शिंदे काय म्हणाल्या यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेत केली वाढ
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गुरुवारी त्यांच्या सुरक्षेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.
दुसरीकडे, आरोपी महेंद्र डोंगरदिवे याची न्यायालयांने तुरुंगात रवानगी केली. हल्ल्याच्या घटनेनंतर आमदार डॉ. सातव यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कळमनुरी न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली.
आरोपी महेंद्र डोंगरदिवे हा इयत्ता नववी उत्तीर्ण आहे. तो मागील काही वर्षांपासून शेळ्या चारण्याचे काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नव्हता. मला शेळ्या चारायला सोडा, मी संध्याकाळी परत येतो, असे तो पोलिसांना सांगत होता.
माजी महापौर महेश कोठे यांनी चेतन नरोटे यांच्यावर टीका केली आहे. बारामती मागणे म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना आगामी निवडणुकीत अडचणीचे असल्याचे महेश कोठे यांनी म्हटले आहे. एकंदरीत सोलापूर लोकसभा निवडणूक अद्याप सव्वा वर्षावर असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच जुगलबंदी रंगल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता हे महाआघाडी बिघडण्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.