टेंभुर्णी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टेंभुर्णीत ११ फेब्रुवारी रोजी निकाली जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खुद्द मुख्य एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील असणार आहेत, अशी माहिती संयोजक तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संजय कोकाटे यांनी दिली. Jangi Kustis organized tomorrow in Temburni; After 15 years, the wrestling arena will be filled in Solapur
११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजल्यापासून पुढे या कुस्ती स्पर्धा टेंभुर्णी येथील करमाळा रोडवरील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल शेजारील भव्य मैदानावर पार पडणार आहेत. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार शहाजी पाटील, आ. सचिन कल्याण शेट्टी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, माजी आ. नारायण पाटील, रिपाइंचे बापूसाहेब जगताप, सुनील मोरे, भाजप तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, व्याख्याते श्रीमंत कोकाटे, राजाभाऊ चवरे, रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील, बाळासाहेब पाटील, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, राष्ट्रीय समाज पार्टीचे माऊली सलगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, वंचित बहुजनचे विशाल नवगिरे, प्रहार संघटनेचे अमोल जगदाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही संजय कोकाटे यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
टेंभुर्णीत सुमारे १५ वर्षांनंतर निकाली कुस्त्याचा आखाडा भरणार आहे. नेत्रदिपक कुस्त्याच्या लढतीचा कुस्ती शौकीन थरार अनुभवणार आहेत. या कुस्त्या पाहण्यासाठी संपूर्ण राज्यासह, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली अशा राज्यातून मल्ल व कुस्ती शौकीन येणार आहेत. हिंदकेसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर, उपमहाराष्ट्र केसरी पै.माऊली कोकाटे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. अक्षय शिंदे, इंटरनॅशनल पै. गणेश जगताप विरुद्ध महाराष्ट्रकेसरी पै. प्रकाश बनकर, पै.संतोष जगताप विरुद्ध पै. पृथ्वीराज मोहोळ, महाराष्ट्र चॅम्पियन पै.सतपाल सोनटक्के विरुद्ध पै.मनोज माने, महाराष्ट्र चॅम्पियन पै. कालीचरण सोलनकर विरुद्ध पै. श्रीनिवास पाथरूट, पै. तोसीब मुलाणी विरुद्ध पै.महेश बिचकुले या प्रमुख
सात कुस्त्यांसह इतरही लहान मोठ्या कुस्त्या खेळवल्या जाणार आहेत. सर्व कुस्त्या मल्लसम्राट रावसाहेब मगर, कुस्ती सम्राट अस्लम काझी, सर्जेराव चौरे, बाशुभाई मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळल्या जाणार आहेत तर कुस्ती निवेदक म्हणून युवराज केचे हे काम पाहणार आहेत. कुस्त्या खेळल्या जाणाऱ्या मैदानाची पहाणी संजय कोकाटे यांनी केली. त्यांच्या बरोबर, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, रयत क्रांती पक्षाचे संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विनोद पाटील, नागेश बोबडे, नागनाथ वाघे, विकास धोत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.