सोलापूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, इंदिरा भवन सोलापूर येथे आज दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा मान्यवरांच्या व दिव्यांग तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या व नॅब परिवारातील कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित आनंदात संपन्न झाला. Life of the deaf and mute is joyous… Solapur Nab celebrates the community wedding ceremony of the disabled.
या मंगलप्रसंगी सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे व नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार, ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. नॅब सोलापूर या संस्थेने २००९ पासून आजतागायत समाजातील या दुर्लक्षित घटकांच्या विवाहाच्या समस्या जाणून,राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळाव्यांचे सातत्याने आयोजन केले आहे.
या वधू-वर व पालक परिचय मेळाव्यातून जमलेल्या जोडप्यांचे सामुदायिक विवाह संपन्न केले. आजपर्यंत एकूण ५२ दिव्यांग जोडप्यांचे विवाह या संस्थेने केले आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हे विवाह सोहळे संस्था आयोजित करीत आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यंदा दोन मूकबधिर जोडप्यांचे विवाह संपन्न झाले.यामध्ये चि.गणेश व चि.सौ. का. श्रावणी यांचा बौद्ध पद्धतीने तर चि.रोहित व चि.सौ.का.अमृता यांचा विवाह हिंदू पद्धतीने मंगलमय वातावरणात संपन्न झाला. रुखवताचे साहित्य,वर-वधूचे कपडे, मंगळसूत्र व इतर संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या दोन्ही जोडप्यांची वरात वाजत गाजत इंदिराभवन येथून लष्कर परिसरातून काढण्यात आली. यात नातेवाईक व संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या मंगल प्रसंगी नवविवाहितांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजन परदेशी शिंदे, अंकुश कदम नॅबचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग चौधरी, सह-सेक्रेटरी सीमा श्रीगोंदेकर, कार्यकारणी सदस्य माणिक यादव,हार्दिक निमानी, सुरेश सरगम,ममता मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाबळेश्वर म्हेत्रे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र कुलकर्णी,अर्चना यलगुलवार, संस्थेचे आजीव सभासद सुभाष माने आजीव सभासद प्रा.जोतिबा काटे, प्रा.चंद्रकांत जाधव डॉ.हनुमंत नारायणकर,सुधाकर वल्लाकाटी, असलम मुलानी सर, शशिकांत शेंद्रे सर, ब्रह्मदेव क्षीरसागर , विशाल शिंदे सर,वर्षा चव्हाण, खंडू शिंदे सर, सचिन चौधरी , राजू मिरेकर सर, अन्नपूर्णा साखरे मॅडम,आकांक्षा दीक्षित,श्वेतांबरी वाडे,यासह विविध विभागांचे कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते.