● कुठं ते घडली घटना …वाचा बातमी
● संपूर्ण गावाला दिले स्नेहभोजनं… शेगावच्या माने कुटुंबियांचा सर्वोत्तमं आदर्श
सोलापूर / शिवाजी हळणवर : ‘स्त्री’ जन्माचे स्वागत कसे करावे ? याचे एक आदर्श आणि सर्वोत्तम उदाहरणं सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या शेगांव या गावात पुढे आले आहे. By adopting ‘Porala’, they adopted ‘Porila’, the incident in the state told the world a new ‘ideal’ Maharashtra Shegaon
शेगाव गावातल्या सुखदेव माने यांच्या कुटुंबातील दोघा सख्ख्या भावंडांनी जगासमोर एक नवा ‘आदर्श’ ठेवला आहे. मोठ्या भावाने लहानं भावाला ‘मुलगा’ दत्तक देवून, चक्क लहानं भावाच्या ‘मुलीला’ दत्तक घेतले आहे. तर लहानं भावाने मोठ्या भावाला ‘मुलगी’ दत्तक देवून, मोठ्या भावाच्या ‘मुलाला’ दत्तक घेतले आहे. विशेष म्हणजे मुलीचे बारसे घालूनं नाव ठेवण्याच्या कार्यक्रमातच, सर्व पाहूणे – रावळे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा ह्रदय, ऐतिहासिक आणि सुंदर सोहळा पार पडला. यावेळी भटजींनी योग्य ते धार्मिक विधीही केले, त्यानंतर खास स्नेहभोजनाचेही आयोजनं करण्यात आले होते.
झाले असे की… बिरुदेव सुखदेव माने (वय वर्षे ३२) आणि त्यांचा लहानं भाऊ आप्पासो सुखदेव माने, (वय वर्षे २८) , हे आपल्या आई – वडीलांसमवेत एकत्र कुटुंबातच राहतात. मोठा भाऊ बिरुदेव याला मुलगी व्हावी असे वाटत होते. मात्र दुसराही मुलगाच झाला. तर लहानं भाऊ आप्पासो याला मात्र दुसरीही मुलगीच झाली. मोठ्या भावाला एक मुलगा, एक मुलगी तर लहानं भावाला दोन्ही मुलीच त्यामुळे घरात आनंदोत्सव सुरु असतानाचं, हा आनंद आणखी द्विगुणीत करण्याचा निर्णय थोरले बंधू बिरुदेव माने यांनी घेतला.
बिरुदेव माने हे सरकारी सेवेत, आरोग्य विभागात कामं करत आहेत. त्यामुळे त्यांना “स्त्री” जन्माचे महत्व माहित होते. त्याशिवाय गेली अनेक वर्षे ते पुरोगामी विचारांच्या चळवळीत कामं करत आहेत. त्यांची सामाजिक जाणं प्रचंड दांडगी आहे. त्यामुळे आपल्याला मुलगी झाल्याचा आणि भावाला मुलगा झाल्याचा आनंद होईल. या भावनेने त्यांनी भावाजवळ दत्तकपुत्र आणि दत्तकपुत्रीची संकल्पना मांडली. त्यावर भावानेही लगेच होकार दिला. दोन्ही दाम्पत्यांनी यासंदर्भात सविस्तर विचार केला आणि त्यानंतर ही गोष्ट त्यांनी आपल्या आई – वडिलांना सांगितली. त्यांनीही त्याचे स्वागत केले. यानंतर त्यांनी आपली बहीण – भाऊजी, सर्व पाहुणे – रावळे, शेजापाजारी, मित्रमंडळी, ग्रामस्थ यांनाही या संदर्भातली माहिती दिली. आणि विशेष म्हणजे या सर्वांनीच त्यांचे जोरदार स्वागत केले.
माने वसतिवर बघता – बघता ही बातमी सर्वत्र पसरली आणि सर्वांनीच हा आनंदोत्सव सोहळा अतिशय दिमाखात व माने कुटुंबियांच्या किर्तिला साजेसा असा साजरा करण्याचा निर्णय घेतला.
बिरुदेव माने यांना दोन मुले होती. थोरल्या मुलाचे नावं, शिवम् बिरुदेव माने, वय वर्षे ५ तर लहानं मुलाचे नावं आरुष बिरुदेव माने, वय वर्षे २, तर लहानं भाऊ आप्पासो सुखदेव माने यांना दोन्हीही मुलीच होत्या. मोठी मुलगी संस्कृती ही ४ वर्षांची आहे. तर लहानं मुलगी अन्विता ही अवघ्या २ महिन्यांची आहे. आरुषला दत्तक देवून अन्विताला दत्तक घेण्याचा निर्णय झाला. तसाच अन्विताला दत्तक देवून आरुषला दत्तक घेण्याचाही निर्णय अन्विताच्या आई – वडिलांनी घेतला. अन्विता २ महिन्यांची आहे. त्यामुळे तिचे बारसे घालून नाव ठेवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आले. तर दुस-या बाजूला दत्तक देण्याघेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रियाही पार पाडण्यात आली. तांत्रिक बाबींची सर्व पुर्तता करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. याची काळजी बिरुदेव माने यांनी घेतली होती. भटजीसह सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली. आणि पहिल्यांदा सर्व उपस्थितांच्या साक्षीने मुलीचे बारसे घालून तिचे नावं अन्विता असे ठेवण्यात आले. सर्वांना तिच्या नावाच्या घुग-या वाटण्यात आल्या. पाळणा म्हणण्यात आला. आत्त्याबाई, अनिता समाधानं मोटे यांनीही तिचे कोड – कौतुक केले. नाव ठेवण्याच्या समारंभातील तिची सर्व भुमिका पार पाडली. आहेर – माहेर, सत्कार समारंभ, साऊंड सिस्टिमं, छायाचित्रणं, चिमुरड्यासह सर्वांना नविनं कपडे, नविनं पाळणां, चहा – पाणी, नाश्ता, जेवणं एखाद्या विवाह सोहळ्यालाही लाजवेल अशा थाटात आणि विधिवत पुजा – अर्चा करुनं आपली परंपरा जोपासत, भटजींच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
दत्तकपुत्र आणि दत्तकपुत्री आपआपल्या नव्या आई – वडिलांच्या, दुस-या अर्थाने काका आणि काकूंच्या कडेवर आली. त्यावेळी सर्वांचा ऊर अभिमानाने भरुन आला. हा ह्रदय सत्कार सोहळा पाहताना अनेकांच्या डोळ्यात आनंदआश्रूही तरळले. त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा जंगी कार्यक्रमं आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांनी या सर्वांना आशिर्वाद देत शुभेच्छाही दिल्या. आई तानूबाई, वय वर्षे ६० आणि वडिल सुखदेव वय वर्षे ६५, एकुलती एक बहीण अनिता या सर्वांनीही उपस्थितांचे आभार मानले.
एकमेकींनी आपली मुलं दत्तक देवू – घेवू केल्याने दोन्ही जाऊबाईंचे कधी भांडणही होणार नाही. तसेच भावाभावातही दुरावा निर्माण होणार नाही. जागा – जमिनीचे वाटप करताना येणारा नात्यांमधला कडवटपणाही नाहीसा होईल. कारण ही दोन्ही मुले आता सर्व कुटुंब एकत्रित ठेवणार आहेत. जमिन – जागा, संपत्ती कालांतराने का असेना त्यांचीच होणार आहे. दोन्ही मुले घरातच एकमेकांसमोर लहानाची मोठी होणार आहेत. त्याशिवाय दोन्ही मुलीच झाल्या म्हणून कोणाला मनस्तापही होणार नाही. आणि कोणं बोलणारही नाही. त्याऊलट दोघा भावंडांना प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. असेही सांगता येईल. त्यामुळे या निर्णयाचे सर्वांनीच मनापासून स्वागत केले आहे. तसेच हा आदर्श सर्वांनाच विचार करायला लावणारा, नाती टिकवून ठेवणारा आपलेपणा जोपासणारा व दिशादर्शक आहे. हे मात्र निश्चित.
आजही आपल्या कानावर अशा अनेक गोष्टी येतात की, मुलगी जन्माला येण्याआधी गर्भातच तिची हत्त्या केली जाते. अगदी स्त्रीभ्रूण हत्त्या बंदी असली तरीही अनेकदा कच-याच्या ढिगा-यात, कचराकुंडीत “स्त्री” जातीचे अर्भक सापडते. आजही स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारण्याचा खटाटोप कांहीजण करत असतात. तिला तिच्या हक्क आणि अधिकारांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. मुलगी जन्माला घातली म्हणून तिच्या मातेला विविध प्रकारचे जाचं सहनं करावे लागतात. मुलगी हे परक्याचं धनं आहे. या गैरसमजूतीमधून, पुन्हा अनेक गैरसमज निर्माण केले जातात. अशा सर्व लोकांच्या डोळ्यात या कुटुंबाने अंजन घालण्याचे महानं कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘आई’ पाठीशी ठामपणे उभी राहिली, तिने घडविले, वाढविले, संस्कार व शिक्षण दिले, आणि आपल्या सर्वांचे दैवत युगपुरुष छत्रपती शिवराय आपल्याला व जगाला मिळाले. यावरुन लक्षात येते की, जगभरातील सर्वच महानं व्यक्तिमत्वांच्या जिवनात आईचा म्हणजे “स्त्रीचा” वाटा किती महत्वाचा आहे.
“ती” आई आहे. “ती” ताई आहे. “ती” मैत्रिण आहे. “ ती” पत्नी आहे. “ती” मुलगी आहे. “ती” जन्मं आहे. “ती” माया आहे, ममता आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, कौतुकाची थाप आहे, शाबासकी आहे. ती आत्मसन्मानं, स्वाभिमानं जिवनाची सुरूवात आहे. त्यामुळे “ती” नसेल तर मग या जगण्याला काय अर्थ आहे ? म्हणून तिच्यामुळे या जगण्याला अर्थ आहे. अन्यथा तिच्याशिवाय जगणंच काय तर मरणं सुद्दा व्यर्थ आहे. म्हणून माने कुटुबियांनी एका अर्थाने आपल्याला जिवनाचा अर्थचं सांगितला आहे. असे म्हंटले तर ते वावगे ठरु नये..!