सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील गुजरातमधील रबर कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती कळताच 50 हून अधिक आग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एमआयडीसीतील गुजरात रबर फॅक्टरीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. Fierce fire at Gujarat Rubber Factory in Solapur, huge financial loss Akkalkot Road
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असून आगीने रौद्ररुप धारण केलं आहे. जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यामध्ये कारखान्यातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली हे अजून अस्पष्ट आहे. दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणीही मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती नाही. आगीत कोट्यावधी रुपयांचे रबर जळून राख झाले आहे. सोलापूर पालिका, एमआयडीसी, एनटीपीसी, अक्कलकोट शहर, बार्शी अग्निशमन दलाच्या प्रथम २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बार्शी येथून 20 अग्नीशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या.
ही आग कोणत्या कारणामुळं लागली याची माहिती समोर आली नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे वृत आहे. कंपनीला आग लागल्यानंतर सोलापूर पालिका, एमआयडीसी, एनटीपीसी, अक्कलकोट शहर, बार्शी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
🔥 #Heavy #fire at #RubberGarmentFactory in #AkkalkotRoad, #MIDC area, #Solapur
🚒 #Firefighters are #trying hard to put out the fire.#aag #solapurpolice pic.twitter.com/wdKUsAtupr
— TodaysVoiceNews24 (@todaysvoice24nz) February 15, 2023
गुजरात रबर फॅक्टरी ही मूळची गुजरात राज्यातील आहे. देशभरात यांच्या विविध जिल्ह्यात शाखा आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुजरात रबर फॅक्टरीचे रबर प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक दुचाकी व चार चाकी वाहन कंपन्याच्या टायरसाठी गुजरात रबर फॅक्टरी रबर निर्यात करते. अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये लागलेल्या आगीचे जवळपास 5 किलोमीटरवर धुराचे लोण दिसत होते.अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले होते.
मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. प्राथमिक माहितीनुसार आगीत जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
सोलापूर महापालिका, तसेच एमआयडीसी, एनटीपिसी, अक्कलकोट शहर, बार्शी येथून 50 अग्नीशमन दलाच्या गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही. परिसरातील इतर कारखानदार हवालदिल झाले आहेत. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
मनपाचे अग्निशमन दल अधिकारी केदार आवटे यांच्यां सह, २५ जणांची टीम आग नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाली होती. तर सोलापूर शहर पोलीस फौज फाटा तळ ठोकून होता. आगीत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली अशी प्राथमिक माहिती समोर आहे. तर गुजरात रबर फॅक्टरी मध्ये सोलापुर शहरातील युनिटमध्ये शेकडो कर्मचारी काम करतात.
मूळची गुजरात राज्यातील ही कंपनी ,देशभरात अनेक ठिकाणी याचे युनिट कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले दुचाकी व चार चाकी वाहन कंपन्यासाठी गुजरात रबर फॅक्टरीमधून उच्च दर्जाचे टायरचे रबर निर्यात केले जाते.