□ प्रचारातील सहभागानंतर बापटांची प्रकृती खालावली
पुणे – कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी प्रकृती ठिक नसतानाही भाजपचे नेते गिरीश बापट मैदानात उतरणार आहेत. त्यावरून प्रशांत जगताप यांनी भाजपवर टीका केली. Bullet train for Bapat’s life by launching Pune by-election campaign आजारी असलेल्या बापटांचा भाजप प्रचारात उतरवून त्यांच्या जीवाचा खेळ करत असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या 5 वर्षात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत बापटांना समावेश करून घेतले नाही, पण प्रचारासाठी बापटांची भाजपला आठवण झाल्याची टीका त्यांनी केली.
नाकाला ऑक्सिजनची नळी लावून कसबा जिंकण्यासाठी काल गुरूवारी भाजपाने जेष्ठ नेते खा. गिरीश बापट यांना प्रचारात उतरवल. त्यांच्या दुसऱ्याच दिवशी आता बापटांची प्रकृती खालावल्याची माहिती पुढे आली असून त्यांना तातडीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलयं.
आठवड्यातून तीनवेळा डायलिसीस कराव लागत. डॉक्टरांचा बाहेर पडण्यास विरोध आहे त्यामुळे आपण वैयक्तीकरित्या प्रचारात उतरणार नाही असं स्वतः बापटांनीच सांगितल होतं. मात्र नंतर वरिष्ठाच्या आग्रहाखातर काल त्यांनी केसरीवाडा येथील कार्यकर्ता मेळाव्यास हजर लावून नाकाला ऑक्सिजनळी, अंगाचा होणारा थरकाप अशा स्थितीत भाषण केलं. त्यांना प्रचारात उतरवल्यावरुन विरोधकांनीही भाजपावर टिका केली होती.
□ पोटनिवडणुकीसाठी सुट्टी जाहीर
कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत असलेल्या विविध आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी अथवा 2 तासाची सवलत देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पुणे जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे याची माहिती देण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः !
पुण्याचे खासदार मा. Girish Bapat जी..#भाजप #RSS कार्यकर्ता
आणि जनतेचे सेवक….
असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख. pic.twitter.com/L0hAo5XL5D— Siddharth Shirole (Modi ka Parivar) (@SidShirole) February 16, 2023
● मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन अकलूज – पंढरपूरमार्गे धावणार, कसा असेल मार्ग वाचा
सोलापूर : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेननंतर मुंबई-हैद्राबाद ही दुसरी बुलेट ट्रेन मंजूर झाली असून ती यापूर्वी सोलापूरमार्गे हैद्राबादला जाणार होती. मात्र आता ती माळशिरस, अकलूज, पंढरपूरवरून सोलापूर मार्गे हैद्राबादला पोहचणार आहे. या नवीन मार्गास पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
मुंबई – अहमदाबाद नंतर मुंबई- हैद्राबाद ही दुसरी बुलेट ट्रेन यापूर्वीच मंजूर झाली आहे. मात्र तिचा नियोजित मार्ग हा सोलापूरवरूनच जाणार होता. भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पांडुरंगाच्या पंढरीतील वारकऱ्यांनाही या बुलेट ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी ही बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जावी, अशी मागणी यापूर्वीच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. त्याला आता रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून लवकरच तांत्रिक मान्यतेचा आदेशही काढला जाणार आहे, अशी माहिती खासदार नाईक-निंबाळकर यांनी दिली.
● ताशी ३५० कि.मी. वेग
या मार्गावर प्रति तास ३५० किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे, तसा त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, हा वेग सरासरी २५० कि.मी. प्रति तास असेल. रूळ स्टैंडर्ड गेजचे असतील. एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे. आत्ता मुंबई- हैद्राबाद प्रवास करण्यासाठी १४ तास लागतात. हा प्रवास बुलेट ट्रेनमुळे अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे.
● असा असेल मार्ग :
एकूण ७११ किलोमीटरच्या मुंबई-
हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई, ठाणे, नवीमुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, माळशिरस, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विक्रमाबाद या मार्गे ही ट्रेन हैद्राबाद येथे पोहचणार आहे. यामध्ये अकरा रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. मुंबई ते हैद्राबाद प्रवास केवळ तीन तासात पूर्ण होणार आहे.
● प्रतीक्षा कॅबिनेटच्या मंजुरीची
मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प एनएचआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सादर करण्यात आला. त्याचा पीएफआर रिपोर्ट व डीपीआर रिपोर्ट झाला आहे. टेक्निकल सर्व्हेसुध्दा चालक विरहित विमानातून झाला आहे. रेल्वे मंडळाला सादर केलेल्या डीपीआरला लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत तांत्रिक मंजुरी मिळेल, असा विश्वास खा. नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
○ तीर्थक्षेत्रात घालणार अभिषेक
मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. म्हणून यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, शिंगणापूर आदी प्रसिध्द मंदिरांत अभिषेक घालून तेथील प्रसाद घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहे.
– रणजितसिंह नाईक-निंबाळकर
(खासदार- माढा लोकसभा)