मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाईत उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या हातून आता शिवसेना पक्ष गेला आहे. धनुष्यबाणही त्यांना मिळाले नाही. Uddhav Thackeray lost! Shiv Sena party and bow and arrow symbol Eknath Shinde got power struggle Election Commission त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळे होत आम्हीच शिवसेना असल्याचे जाहीर केले होते व त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून दोन्ही गटात पक्ष नेमका कुणाचा? याविषयी वाद सुरु होता.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आज घडली आहे. शिवसेना हा पक्ष आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. तसेच धनुष्यबाणही शिंदे यांनाच मिळाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगातील लढाईत एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाला मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही गटाला वेगवेगळे नाव आणि चिन्ह देण्यात आले होते.
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. तसेच शिवसेना पक्ष म्हणून शिंदेंच्याच गटाला मान्यता दिली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हा सत्याचा विजय आहे, हा बाळासाहेंबाच्या विचारांचा विजय आहे, लोकशाहीचा हा विजय असून बहुमताचा विजय झाला आहे, असे म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे आभार मानत यापुढे बाळासाहेबांच्या विचाराने राज्यकारभार करु असे शिंदेंनी म्हटले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आता ठाकरेंच्या हातून गेली आहे. तसेच शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाला आहे. याचे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे पडसाद उमटणार आहेत. पुढल्या निवडणुकीत आता जनता कुणाला साथ देणार? याकडे लक्ष लागले आहे. पण यामुळे महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलणार, हे मात्र निश्चित.
निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. #शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे तमाम जनतेला देतो. pic.twitter.com/42Z5bwqrUz
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 17, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. 2018 मध्ये दुरुस्त केलेली शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नव्हती, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेबच राहतील अशी पक्षाची भूमिका होती. त्यामुळे 2013 साली उद्धव ठाकरेंची निवड पक्षप्रमुख म्हणून झाली. त्यानंतर 5 वर्षांनी कार्यकाळ संपल्याने 2018 मध्ये पुन्हा ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड झाली होती.
निवडणूक आयोगाने आज धनुष्यबाण आणि शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यानंतर ट्विटरवर शिंदे यांनी प्रोफाइलचा फोटो बदलला आहे. शिंदे यांच्या प्रोफाइलवर आता धनुष्यबाण हे चिन्ह आहे. दरम्यान शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळे होत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. तसेच आम्हीच शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर निवडणूक आयोगानेही आज शिक्कामोर्तब केले आहे.
शिवसेना व धनुष्यबाण हातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा निर्णय आम्हाला मान्य नाही, जनतेलाही हा निर्णय मान्य नाही, जनता योग्य धडा शिकवेल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. रामायणात जसा रामाचा विजय झाला, तसाच विजय आमचाही होणार, असाही विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शिंदे गटाला धनुष्यबाण देण्यात आला आहे.