मुंबई : अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. ते 56 वर्षाचे होते. रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होते. Death of Shahnawaz Pradhan, Guddu Bhaiya’s father-in-law in ‘Mirzapur’ web series
एका सत्कार समारंभात गेले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे ते तिथेच बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ अंधेरीच्या कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये शाहनवाज प्रधान यांनी गुड्डू भैयाच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती.
अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे आज निधन झाले. त्यांनी ‘जन से जनतंत्र’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘देख भाई देख’, ‘अलिफ लैला’, ‘ब्योमकेश बख्शी’, ‘बंधन सात जन्मों का’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘फँटम’ आणि ‘रईस’ सारख्या सिनेमांत देखील ते झळकले आहेत. तसेच ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्ये त्यांनी काम केले आहे.
🙏 Om Shanti Shahnawaz Pradhan sir
Met you once & it was a great feeling…
🔹in Alif Laila as Sindbad
🔸Four characters in Shri Krishna 1) Nand Baba, 2) Shursen, 3)Raja Mahabali & 4) Chanur all in different voices
🔸in Mirzapur as Parshuram Gupta, father of Sweety Gupta & Golu pic.twitter.com/g9SpZbJHiR— Abhishek Bhalerao (@mumbaiactor_) February 17, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मिर्झापूर वेब सीरिजमध्ये शाहनवाज प्रधानने गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. ते श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी) यांचे वडील परशुराम गुप्ता होते. मिळालेल्या माहिती नुसार शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने. त्यांना तातडीने मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
शाहनवाज यांनी आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनच्या श्री कृष्णामध्ये नंदीची भूमिका साकारली केली होती. नंतर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इतर अनेक टीव्ही शो आणि चित्रपट केले. अलीकडे, मिर्झापूर 1 आणि मिर्झापूर 2 सह त्यांनी वेब स्पेसमधील रईस आणि खुदा हाफिज, फॅमिली मॅन सारख्या शोमध्ये देखील काम केले.
● पृथ्वीसोबत मारामारी करणारी सपना कोठडीत
पृथ्वी शॉसोबत हाणामारी करणारी अभिनेत्री सपना गिलला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. ओशिवरा पोलिसांनी तिला अंधेरी कोर्टात आज हजर केले होते. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत सपनासह काहीजण पृथ्वीसोबत वाद घालताना दिसत आहेत. या प्रकरणी एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. सपना ही मॉडेल आणि अभिनेत्री असून ती भोजपुरी चित्रपटात झळकली आहे.