● सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची मिरवणुकीत राहणार उपस्थिती
सोलापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उद्या, 19 फेब्रुवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. Shiv Jayanti: Actress Prajakta Gaikwad Yesubai will attend procession in various circles and activities in Solapur tomorrow. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध मंडळांच्या भेटी आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी त्यांचा हा विशेष दौरा असणार आहे.
संभाजी आरमार संघटनेचा पालखी सोहळा आणि शिव रॅलीला श्री नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होणार आहे. दिवसभरामध्ये शिवजन्मोत्सव मिरवणुकीतील दहा ते पंधरा मंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे त्यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम यांच्यावतीने शिवभोजन उपक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यामध्ये 11 हजार शिवभक्तांना भोजन प्रसाद देण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री नरेंद्र पाटील उपस्थित असणार आहेत. हे कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहे.अशी माहिती अण्णासाहेब पाटील विकास फॉउंडेशन जिल्हा अध्यक्ष,मराठा क्रांती मोर्चा समनव्यक राम जाधव यांनी दिली.
□ शिवजयंती निमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त, दुपारी चार वाजता मिरवणुकीला प्रारंभ
सोलापूर : शहरात शिवजयंती निमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने रविवारी दुपारी ४ वाजता डाळिंबी आड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची विधिवत पूजा करून मिरवणूकीस प्रारंभ करण्यात येणार आहे.
दरम्यान मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. जवळपास १२०० पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त या मिरवणूक करता लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
यात ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त,२० पोलीस निरीक्षक,५६ सहायक पोलीस निरीक्षक,८७३ पोलीस अंमलदार,४० महिला पोलिस अंमलदार,२० एस आर पी एफ प्लॅटुन आणि ४०० होमगार्ड असा हा बंदोबस्त असणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मिरवणुकीत डॉल्बी, डीजे लावू नये असे पोलीस प्रशासनाने यापूर्वीच सर्व मंडळांना सुचित केले आहे. शहरातील जवळपास ६० ते ७० उत्सव मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविणार आहेत. मिरवणुकीचे मार्ग निश्चित झाले आहेत. त्या दृष्टीने नागरिकांना वाहतुकीस कोणतेही अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेत वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान शहरातील विविध शिवजन्मोत्सव मंडळ आपल्या पारंपारिक लेझीम,डॉल्बी,ढोलीबाजा पथकांसह सहभागी होतील.या मिरवणुकीमध्ये शहरातील वारकरी संघटनेचे भजनी मंडळ, लेझीम, झांज, ढोल पथक, शिवछत्रपतींच्या जीवनावरील देखावे, लेझर शो इत्यादी विविध प्रकार सादर करण्यात येणार आहेत. मिरवणूक वेळेत काढण्यात येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहभागी मंडळांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचेही पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले.
● येसूबाईंच्या वेशभूषेत सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती !
– भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी भव्य मिरवणूक !
सोलापूर : उत्तर कसबा येथील भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त उद्या रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या येसूबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुरज बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या येसूबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत. यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. लक्षवेधक अशी ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मिरवणूक मार्गावरील बंदोबस्तात असलेल्या सर्व पोलिसांना फूड पॅकेट वाटप करण्यात येणार आहे.
संस्थापक अध्यक्ष सुरज बंडगर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उत्सव अध्यक्ष प्रसाद पवार, राज सलगर , सुरज बावधनकर, समर्थ कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.