सोलापूर – नदीचे पात्र कायम प्रवाही राहिले तरच जीवन समृद्ध होते. प्रत्येकाने नदीच्या स्वच्छतेसाठी अग्रक्रमाने पुढाकार घ्यावा, सगळ्यांच्या सहकार्यातूनच नदीचे पावित्र्य राखणे शक्य आहे. Bhaktisangam at Kudal Ghat on the occasion of Mahashivratri; Sangam Aarti was performed on the lines of Kashi, the temple was filled with crowds of Shiva devotees आजच्या काळामध्ये पर्यावरण संवर्धनाची खूप मोठी जबाबदारी सर्वांवर आली आहे. ज्या हेतूने ही संगम आरती सुरू करण्यात आली आहे, ती खरोखरच अध्यात्मिक आणि वास्तविक जीवनात काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मंद्रुप पोलीस ठाण्याचे एपीआय रवींद्र मांजरे यांनी केले.
महाशिवरात्रीनिमित्त हत्तरसंग कुडल (दक्षिण सोलापूर) येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी दि.18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. एपीआय मांजरे यांच्या हस्ते संगम आरती करण्यात आली.
प्रारंभी दीपप्रज्वलन सोलापूर सीआयडीचे डीवायएसपी श्रीशैल गजा, तर गंगापूजन एमके फौंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे तर डॉ.अनिल हविनाळे यांच्या हस्ते नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले.
दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती आणण्यात आली. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सूर्यास्ताच्या वेळी काशीच्या धर्तीवर भीमा-सीना नद्यांच्या संगम घाटावर भक्तिमय वातावरणात संगम आरती करण्यात आली.
कृषी संस्कृतीचा विकास व्हावा, भीमा-सीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत रहावा, नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यंदा आरतीचे चौथे वर्ष होते. तत्पूर्वी पहाटेच्या सुमारास श्रींच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगातील एकमेव दुर्मिळ अशा बहुमुखी शिवलिंगाचा अभिषेक करून, पूजा करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासूनच रांग लागली होती. बहुमुखी शिवलिंग, संगमेश्वरांचे शिवलिंग, पंचमुखी परमेश्वर शिवलिंगास बिल्वरचन पत्र अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
तसेच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था केली होती. बिराजदार हे गेल्या 20 वर्षापासून हे महाप्रसाद व्यवस्था करत आहेत.
यावेळी देवस्थान समितीचे सचिव देविन्द्रप्पा पाटील, संगप्पा केरके, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार, मधुकर बिराजदार, शंकर टाकळी, अण्णाराव पाटील, बसवराज बिराजदार, हणमंत बगले, पंडित पुजारी, चिदानंद पुजारी, संगय्या स्वामी, शिवानंद पाटील, मळसिद्ध मुगळे, सिद्धाराम उमदी, प्रकाश पाटील, मल्लप्पा पाटील, मल्लिकार्जुन यमदे, काशिनाथ भतगुणकी, चन्नप्पा बगले, श्रीशैल पुजारी, सिध्दराम बिराजदार यांच्यासह आदि भाविक महाआरती गंगा आरतीच्या वेळेस उपस्थित होते. सूत्रसंचालन हणमंत बगले, प्रास्ताविक संगप्पा केरके, संगमेश जेऊरे यांनी केले.तर काशिनाथ भतगुणकी यांनी आभार मानले.
महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असल्यामुळे योगायोगाने आज संगमेश्वर महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संध्याकाळी संगम आरती करण्याचे भाग्य मिळाले, संगम आरतीचा उपक्रम हा खूप कौतुकास्पद आहे. आरती करण्यास उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला मिळाल्याने मी भारावून गेल्याची भावना सीआयडीचे डीवायएसपी श्रीशैल गजा यांनी व्यक्त केली.