¤ ‘सुराज्य ‘चे शिवाजी हळणवर यांना ‘राज्य स्तरीय आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार’
सोलापूर – महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने राज्य भरातील आदर्श ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करीत ‘महाराष्ट्र ऊस भुषण कार्य गौरव पुरस्कार’ देवून त्यांचे प्रोत्साहन वाढविले जाते. Maharashtra State Sugarcane Growers Association awards announced, distribution ceremony in Kolhapur on March 12 Agriculture त्याच बरोबर शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या, उपाय हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून आवाज उठविणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करीत आदर्श कृषी पत्रकार कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते. त्यामुळे यंदाचा संघाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार सुराज्य चे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी हळणवर यांना जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या प्रत्येक वर्षी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करते. सन २०२२ मधील पुरस्काराची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष किरण चव्हाण व संघाचे संस्थापक अतुल माने पाटील यांनी केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा १२ मार्च रोजी दुपारी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मधील आर के.कार्यालय येथे होणार असल्याची माहिती निवड समितीने दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी सुरेश चिंचवडे ( पुणे ),विक्रमसिंह भोसले (सातारा) नामदेव पवार (माढा ) गजानन कदम (सांगली)अमोल खोत (कोल्हापूर) भारत बाबर( बार्शी ) ज्योतीराम चव्हाण (माळशिरस)योगेश पवार (सातारा) जयराज भोपळे (बारामती) धर्यशिल पाटील (वाळवा) रावसाहेब वडवडे (मिरज) सौ.विद्युलता देशमुख (कडेगाव ,सांगली) अमोल लोंढे (माढा) लक्ष्मण पाटील( कागल) सागर खोत (कागल) महादेव ताकमारे (करवीर) संदिप आरगे (हातकणंगले) शरद भंडारी (हातकणंगले) प्रशांत चांदोबा (शिरोळ) यांना सन २०२२ चे महाराष्ट्र ऊस भुषण कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
कृष्णात पाटील , उत्तम परीट, कृष्णात मारूती पाटील
(कागल) बापूसाहेब आवटे (हातकणंगले) जनार्दन पाटील (कोल्हापूर) यांना ‘महाराष्ट्र उस विकास कार्य गौरव’ पुरस्कारांने सन्मानीत करण्यात येणार असून यावेळी दै सुराज्य चे प्रतिनिधी शिवाजी हळणवर ( पंढरपूर) व राजकुमार चौगुले( शिरोळ)यांना सन २०२२ चा राज्य स्तरीय आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार’ देवून गौरविण्यात येणार असल्याची घोषणा निवड समितीने केली आहे.
या पत्रकार परिषदेस अतुल मस्के,केळी उत्पादक संचाचे अध्यक्ष किरण चव्हाण,उत्तम परिट,राजेंद्र डुचे पाटील आदीसह निवड समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
□ ऊस विकास परिषद
राज्यातील ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आजची परिस्थिती नाजूक झाली असून शेतीतील समस्या वाढत आहेत. यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ऊस विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अधुनिक ऊस तंत्रज्ञान यावर संजिव माने यांचे ‘एकरी १०० टन सहज शक्य’ याविषयी तर उत्तमराव परिट यांचे ‘आदर्श ऊस शेती’ यावर मार्गदर्शन तर संतोष सहाणे यांचे सेंद्रिय शेती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या विकास परिषदेस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले.