मुंबई : शिवसेना नाव आणि चिन्हं शिंदे गटाला मिळाल्यानंतर उध्दव ठाकरेंना नवीन पक्ष स्थापन करावा लागणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. A new party has to be formed, otherwise Vanchit Prakash Ambedkar will remain from the Thackeray group elections पण त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी जाईल. अशातच एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ठाकरे गटाला एक राजकीय पक्ष म्हणून या निवडणुकीपासून वंचित राहावे लागेल, अशी शक्यता आंबेडकरांनी व्यक्ती केली आहे.
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण पाहता, एप्रिलअखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक झाली तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याचीही शक्यता आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काल सोमवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे. ही आमची वैयक्तिक युती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही २०२४ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आहे.
○ तर आम्ही एकटे लढण्यास मोकळे
प्रकाश आंबडेकर म्हणाले की, “राज्यातील 2024 पर्यंतच्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढणार आहोत, पण शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मनोमिलन कायम राहिले, तर आम्ही एकटे लढण्यास मोकळे आहोत.”
त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपली युती झाली नसल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. ते म्हणाले की, आमची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत नाही. मात्र, युतीची घोषणा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपण महाविकास आघाडीसोबत आहोत, तुम्ही सुद्धा महाविकास आघाडी सोबत यायला हवे, असे म्हटले होते.
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली असली तरी महाविकास आघाडीतील त्यांच स्थान काय हा प्रश्न होता. त्यावर बोलताना आज ते म्हणाले की “आम्ही महाविकास आघाडी सोबत येणार नाही असे कधीच म्हटले नव्हते; मात्र त्यानंतरही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कोणताही प्रस्ताव किंवा अनुकूलता नाही. आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही.”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 अजित पवारांनी पत्र दाखवल्यानेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली
कोश्यारी यांच्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा खळबळ
मुंबई – राज्यपाल असताना सतत वादात राहणारे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाता- जाता गौप्यस्फोट करून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. फडणवीस- पवार यांचा पहाटे नव्हे. सकाळी आठ वाजता शपथविधी झाला. अजित पवार यांनी आमदारांच्या सह्या असलेले पत्र दाखविले. त्यामुळेच महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवली. त्यानंतर सरकार अस्तित्वात आले होते, असा दावा कोश्यारी यांनी केला आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना ठरली आहे. या घटनेबाबत अजूनही विविध खुलासे होत आहेत. नुकतेच कोश्यारी यांनीही या पहाटेच्या शपथविधीबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाला
मुलाखत दिली.
या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारले की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखविले. मग शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. पुढे न्यायालयात आव्हान दिल्यावर त्यांनी माघार घेत राजीनामा दिला.