□ राज्यपालपदावरून उतरताच कोश्यारींनी तोंड उघडलं
• मुंबई : उध्दव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. He dropped me from the plane, fate pulled him down from the chair: Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray उध्दव ठाकरे मुख्यमंत्रिपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती. तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उध्दव ठाकरेंना वाचवू शकला नाही. मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीनं त्यांना मुख्यमंत्रिपदावरून, त्या खुर्चीवरून खाली उतरवलं आहे. मी त्यांना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीनं जे करायचं ते केलं, अशी खोचक टीका माजी राज्यपाल कोश्यारींनी केली.
सोमवारी कोश्यारी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. फेब्रुवारी २०२१ मध्ये भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी येथे आयएएस अकॅडमी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचे होते. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते. या घटनेचा संदर्भ पकडून त्यांनी मला विमानातून खाली उतरवलं, आज नियतीनं त्यांना मुख्यमंत्रिपदावरून, खुर्चीवरून खाली खेचलं’, अशी उपरोधिक टीका कोश्यारी यांनी केली.
कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी मंजूर केली नव्हती. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना कोश्यारी म्हणाले, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळं माझ्याकडे यायची. मी त्यांना एकदा मी त्यांना सांगितले की, हे पहिले पाच पानी पत्र बघा. पाच पानी पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. हा कायदा, तो कायदा म्हणत धमकावत आहात. पत्रात शेवटी लिहिलं होतं की, पुढील १५ दिवसांत मंजूर करा. कुठं लिहिलं आहे की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतात की हे एवढ्या दिवसांत मंजूर करा म्हणून ? हे कुठं लिहिलंय संविधानात ?
ते पत्र पाठवलं नसतं, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी १२ आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशींवर सही करणार होतो, असे कोश्यारी यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● ते अडकले शकुनीमामांच्या चक्रव्यूहात
उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगलेच होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते? शिवसेनेचे आमदार माझ्याकडे येऊन आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे हे शकुनीमामांच्या चक्रव्यूहमध्ये अडकले आहेत, असे सांगायचे. माहिती नाही की, त्यांना कोणते शकुनीमामा मिळाले होते? उद्धव ठाकरे तर सज्जन माणूस आहेत, बिचारे राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत, असे मतही उध्दव ठाकरेंविषयी कोश्यारींनी व्यक्त केले.
● पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले कोश्यारी ?
पहाटेचा शपथविधी म्हणणं चुकीचं आहे. कारण तो सकाळचा शपथविधी होता. जर अजित पवार माझ्याकडे आमदारांच्या सह्या असलेलं पत्र घेऊन येतात आणि हे सांगतात की आम्हाला सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे तर मग मी काय करायला हवं होतं? देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार हे देखील सांगितलं. सकाळीच शपथविधी करायचा हे अजित पवारांनी सांगितलं. मी हो म्हटलं. त्यात काय चुकीचं आहे? असा प्रश्न भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी उपस्थित केला.
● उध्दव समोर येत नव्हते
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा प्रस्ताव आदित्य घेऊन आला होता. तो सारखा फोन करायचा. मी त्याला विचारलं अरे तुमचा नवरदेव कुठे आहे? त्याला आधी आणा. उद्या त्याने मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तर ? तरीही उद्धव ठाकरे पुढे आले नाहीत. मी त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना सांगितले की हे चुकीचे आहे. पटलेही बोलले हे चुकीचेच आहे. विचारा छगन भुजबळ व अन्य नेत्यांना हे सत्य आहे की नाही? तीन तासांनी उद्धव ठाकरे समोर आले. यावर कोणीच काही बोलत नाही? असाही प्रश्न कोश्यारी यांनी यावेळी विचारला.