विरवडे बु : प्रेम संबंधाच्या कारणावरून एका प्रेयसीने व तिच्या साथीदारांनी एका 45 वर्षीय प्रियकराचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना कोरवली ते वाघोली शिवेवर रविवारी ते सोमवारी (ता.19 ते 20) च्या दरम्यान घडली. Lover’s murder in Koravali due to love affair Kamti Police Solapur लक्ष्मण येताळा व्हळगुंडे (रा औंढी ) असे मृत प्रियकराचे नाव आहे. या संदर्भात महिलेसह तिच्या साथीदारावर कामती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत लक्ष्मण हा औंढी (ता मोहोळ) येथील शेतातील वस्तीवर राहत होता. त्याचे कुरूल येथील एका महिले बरोबर प्रेम संबंध होते. त्यांची आपसात सारखी भांडणे होत होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापूर्वी त्या महिलेस लक्ष्मण म्हणून बरोबर असलेले प्रेम संबंध सोडण्यास सांगितले होते. त्यावेळी त्या महिलेने लक्ष्मणला जीवे ठार मारूनच प्रेम संबंध सोडते असे बजावले होते.
रविवारी सकाळी लक्ष्मण हा मेथीची भाजी विकण्यासाठी औंढी गावात आला होता. दरम्यान लक्ष्मण चा भाऊ हरी व्हळगुंडे हा कामावरून सायंकाळी घरी आला असता त्याने भावजयजवळ लक्ष्मणबाबत चौकशी केली असता, तिने मी सकाळी सात वाजता पती लक्ष्मण यांना फोन केला होता त्यावेळी त्यांनी मी “त्या” प्रेयसी सोबत आलो आहे, नंतर फोन करतो असे सांगितले व फोन बंद केल्याचे दिर हरी यास सांगितले.
सोमवारी सकाळी हरी घरी असताना औंढी गावचे पोलीस पाटील सिताराम भुसे यांनी लक्ष्मणला सांगितले की, तुझ्या भावाचा कोरवली ते वाघोली शिवेवर खून झाला आहे. ही माहिती मिळताच मृत लक्ष्मणचा भाऊ हरी व इतर नातेवाईक घटना स्थळी दाखल झाले.
त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी मृत लक्ष्मण याची मोटर सायकल (क्र एम एच 13 बीएल 0261 ) ही रस्त्यावर लावलेली होती व तिच्यावर रक्त सांडलेले होते. मोटार सायकल पासून 90 फूट अंतरावर लक्ष्मण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या तोंडावर मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे भाऊ लक्ष्मण व इतरांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी लक्ष्मण यास कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद हरी येताळा व्हळगुंडे ( वय 36 रा. औंढी) याने कामती पोलिसात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 जमिनीच्या वादातून काकाने पुतणीला फेकले सीना नदीत
तुमचा वंशच शिल्लक ठेवत नाही; भाऊ- भावजयला धमकावले
सोलापूर : आईच्या नावावरील ६ एकर जमीन माझ्या नावावर करून न देण्यासाठी तुम्ही दोघेच जबाबदार आहात, आता तुमचा वंशच शिल्लक ठेवत नाही, असे भाऊ आणि भावजय यांना धमकावून सख्ख्या भावानेच भावाच्या चार वर्षाच्या मुलींचा खून करून मृतदेह सीना नदी पात्रात टाकून दिल्याची घटना सोमवारी सकाळी आठ च्या सुमारास मलिकपेठ येथील सीनानदी पात्रात घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोधन शिवाजी धावणे (रा. डिकसळ ता. मोहोळ) यांच्या कुटुंबास एकूण १६ एकर जमीन आहे. त्यापैकी यशोधन धावणे याचे नावावर ५ एकर, त्यांचा भाऊ यशोदीप धावणे यांच्या
नावावर ५ एकर तर बाकीची ६ एकर जमीन त्यांच्या आईच्या नावावर आहे. आईच्या नावावर असलेली ६ एकर जमीन माझ्या नावावर करा म्हणून यशोदीप वारंवार भांडण काढत होता. त्यास गावातील प्रतिष्ठित लोकांनी बऱ्याचवेळा समजावले होते. आईवडील असेपर्यंत त्यांच्या नावावर राहू द्या, नंतर ती तुम्हा दोघा भावांच्या नावावरच होणार आहे, असे वेळोवेळी समजावत होते.
गावातील लोकांनी बैठक घेत त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र, तरीही त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान, सोमवारी (२० फेब्रुवारी) पुन्हा यशोधन आणि यशोदीप या दोन्ही भावात वाद झाला. आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीपने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकी दिली.
सोमवारी सकाळी सातच्या सुमारास यशोदीप हा त्याचा भाऊ यशोधन बरोबर शेताच्याच कारणावरून तक्रार करू लागला. ‘आईच्या नावावरील सहा एकर जमीन माझ्या नावावर करू न देण्यासाठी तुम्ही दोघे नवरा बायको जबाबदार आहात’, असे म्हणत मोठमोठ्याने शिवीगाळ करीत गोंधळ घालू लागला. भाऊ यशोधन व त्याची पत्नीस आज तुमचा फैसलाच करतो, तुमचा वंशच ठेवत नाही, म्हणून शिवीगाळ करीत होता. त्यास काही लोकांनी समजावून सांगून शांत केले. यशोधन त्याची पत्नी व आई असे शेतातील कामे करण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास निघून गेले. घरात वडील व मुलगी ज्ञानदा झोपले होते. थोड्या वेळाने यशोधन घरी आला तेव्हा त्यास त्याची मुलगी दिसली नाही. त्यावेळी त्याचा भाऊ यशोदीप याने ज्ञानदाला मलिकपेठ येथे सीना नदीत टाकून दिले असल्याचे सांगितले. तेव्हा घाबरून यशोधन व इतर सर्व जण मलिकपेठ येथे नदीवर आले असता पुलाच्या पूर्वेस मुलगी ज्ञानदा ही तरंगत असताना दिसली. जमलेल्या लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले. याबाबत मुलीच्या पित्याने फिर्याद दिली असून मुलीचा चुलता यशोदीप धावणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.