सोलापूर : मंगळवेढा येथे आज दुपारी एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर संशयित पुरुषाला ताब्यात घेतले असल्याची माहितीही समोर आली आहे. Brutal murder of three women in Mangalvedha, suspect Mathefirus arrested in Nandeshwar
आज दुपारी अज्ञात माथेफिरूने दगड आणि धारदार शस्त्राने ही हत्या केली. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे अज्ञाताने एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. दीपाली माळी, पारुबाई माळी, संगीता माळी असे हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.
नंदेश्वर गावातील लवाटे वस्ती येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे आढळून आले आहे. मंगळवेढा शहरात आज मंगळवार (ता. 21) रोजी संध्याकाळी एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर संशयित पुरुषाला ताब्यात घेतले असल्याची माहितीही समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नंदेश्वर गावातील लवाटे वस्ती येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
● अकलूज येथे कोयता आणि दगडाने मारहाण; महिलेसह दोघे जखमी; १४ जणाविरुद्ध गुन्हा
अकलूज – येथील क्रांती सिंह नगरात पूर्वीच्या भांडणावरून कोयता, दगड आणि काठीने झालेल्या मारहाणी महिलेसह दोघेजण गंभीर जखमी झाले ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली या प्रकरणात अकलूजच्या पोलिसांनी दोन महिलासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दीपक सदाशिव काळे (वय १९) आणि त्यांची आत्या सकराबाई सोनबा चौगुले (दोघे रा. क्रांतिसिंह नगर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. या संदर्भात जखमी दीपक काळे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी ऋषी राजू पवार, दिलीप चौगुले, रोहित पवार, संतोष पवार, शुभम पवार, सोहम धोत्रे, प्रदीप पवार, ओंकार माळी, रंजीत पवार, आकाश धोत्रे, अजय पवार, सोमा पवार, उमा औदुंबर काळे आणि मंगल लक्ष्मण पवार (सर्व रा.क्रांतिसिंह नगर) अशा १४ जणाविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमावून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दीपक काळे आणि त्यांची आत्या सकराबाई चौगुले असे दोघे काल दुपारी क्रांतिसिंह नगरातील बुवा यांच्या किरणा दुकानासमोर थांबले होते. यावेळी वरील आरोपींनी मिळून त्यांना कोयता, दगड आणि काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार बोराटे करीत आहेत .
● साखर कारखान्यातील मुकादमास काठीने मारहाण; दोघांवर गुन्हा
अक्कलकोट – कामावरून काढून टाकले, आणि पगार अडवून ठेवण्यास तूच जबाबदार आहे. या कारणावरून साखर कारखान्यातील मुकादमास काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रुद्धेवाडी येथील मातोश्री साखर कारखान्याच्या गोदामात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
या प्रकरणात अक्कलकोट दक्षिणच्या पोलिसांनी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगलदास शंकर पुजारी (वय २२ रा. कल्लप्पावाडी ता.अक्कलकोट)असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चनमलप्पा अर्जुन पुजारी आणि शंकर यल्लप्पा गजरी (रा.रुद्धेवाडी) या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगलदास पुजारी हे रविवारी रात्री कारखान्याच्या गोदामात काम करीत होते. त्यावेळी पुजारी याच्यासह दोघे गोदामात घुसून पाटील साहेब कुठे आहेत? त्यांना पगार देण्यास सांग. तूच आमचा पगार अडवून ठेवण्यास सांगितले. असे म्हणत त्यांना काठीने मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार कोळी पूढील तपास करीत आहेत.