● नवा अभ्यासक्रम 2025 पासून होणार लागू
● मुख्यमंत्री शिंदेंनी मानले आभार
पुणे : एमपीएससीने सुधारित परीक्षा योजना तसेच नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. MPSC Students’ Struggle Succeeded; Sharad Pawar’s charisma remains Devendra Fadnavis Eknath Shinde पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.
यावर शरद पवारांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे. तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे, असे पवारांनी म्हटले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे’ असे एमपीएससीने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
साहेब तुमच्यामुळेच शक्य झालं…!
एमपीएससी च्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य.💯@PawarSpeaks @NCPspeaks @mpsc_office pic.twitter.com/wCleUV7bnv— Sahil Raikar (@Raikarspeaks) February 23, 2023
MPSC ने नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले. कालही शरद पवारांचा करिश्मा कायम होता, आजही कायम आहे आणि भविष्यातही कायम राहणार, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, पवारांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केले होते.
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत म्हटले. दरम्यान, MPSC ने नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश मिळालं आहे. विद्यार्थी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील भेट दिली होती.
शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांची बैठक घेण्याचे आव्हान केले होते. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला आहे.
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. एमपीएससीने आता नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांनाही मनापासून शुभेच्छा!, असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.
● एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे मोबाईल टॉर्च लावून केले होते आंदोलन
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे. आंदोलन स्थळावरील स्ट्रीट लाईट बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळाले. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. आजही झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन सुरुच आहे.