● खासदार निंबाळकरांचा गौप्यस्फोट
सोलापूर : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्या; म्हणून हेलपाटे मारत आहेत. Devendra Fadnavis rejects Ram Rajen’s entry into the BJP MP Nimbalkar Confidential Explode Politics पण, फडणवीस यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली,’ असा गौप्यस्फोट भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
इंग्लंडचे पंतप्रधान आले तरी फलटणची जनता आम्हालाच मतदान करेल, असे विधान रामराजेंनी केले होते. त्यावर खासदार निंबाळकर बोलत होते. ते म्हणाले की इंग्लंडहून पंतप्रधान येण्याची गरज नाही. आमचे उपमुख्यमंत्री फडणवीसच रामराजेंना पुरसे आहेत. अनेक दिवस झाले रामराजे हे फडणवीसांकडे आम्हाला भाजपमध्ये घ्या; म्हणून हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्याला फडणवीस यांनी नकार दिला, त्यामुळेच बहुतेक रामराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच सभेतून घड्याळाचे चिन्ह, शरद पवारांचा फोटो गायब झाला होता. फलटणमध्ये असं अनेकवेळा होतं. त्यांना असं वाटलं की मला भाजपमध्ये अथवा शिवसेनेत घेतील, त्यावेळी ते चिन्ह गायब करतात, असाही आरोप निंबाळकरांनी केला.
● दिलेला शब्द पूर्ण करण्याचा निर्धार
नीरा देवघर प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर लोहमार्गासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा देत निधीची तरतूद केली. त्याच दिवशी फटलणच्या सत्र न्यायालयास मंजुरी दिली. ग्रामीण रुग्णालयाचा आराखडा तयार करायला लावला. तसेच, गडकरी यांनी हजारो कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे, असे खा. निंबाळकरांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 शिव ठाकरेने घेतली राज ठाकरेंची भेट
बिग बॉस उपविजेता शिव ठाकरेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी शिवला भेटीसाठी खास आमंत्रण पाठवलं होतं. राज ठाकरेंसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची शिव ठाकरेने भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. ते माझे फॅन्स आहेत. त्यांना माझं अभिनंदन करून शाबासकी द्यायची होती, म्हणून त्यांनी मला घरी भेटायला बोलावलं होतं, असे शिवने सांगितले आहे.