सोलापूर – बार्शी ते येरमाळा रोड वरील पाथरी गावाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकी वरील जावई आणि सासू हे दोघे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात गुरुवारी (ता. २३) दुपारच्या सुमारास घडला. Accident on Barshi to Yermala Road; Son-in-law and mother-in-law killed on two-wheeler
दिनकर केशव डुमणे (वय २९) आणि त्याची सासू देवकाबाई सीताराम डुहाळे (वय ४५ दोघे रा.जामरुन ता.औंढा जि. हिंगोली) असे मयतांची नावे आहेत. ते ऊस तोडीचे मजुर असून सध्या बार्शी येथे राहण्यास होते. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सासू आणि जावई हे दोघे दुचाकी वरून बार्शी ते जामरून येथे आपल्या गावी निघाले होते. येरमाळा रोडवरील पाथरी गावाजवळील विद्युत मंडळाच्या कार्यालयाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने दोघेही गंभीर जखमी झाले होते.
दोघांना उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून रात्री सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दिनकर डुमणे हा रात्रीच मयत झाला. तर तिची सासू देवकाबाई डुहाळे ही शुक्रवारी सकाळी मरण पावली. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली असून प्राथमिक तपास हवालदार चमके करीत आहेत.
● शेतातील कचरा जाळताना ८० वर्षीय महिलेचा भाजून मृत्यू
सोलापूर – शेतातील कचरा जाळत असताना साडीला आग लावून भाजल्याने ८० वर्षीय वृद्ध महिला भाजून मयत झाली. ही घटना सनमडी (ता.जत जि.सांगली) येथे घडली. हुवक्का मेसप्पा कांबळे (वय ८० रा. सनमडी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या २१ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास आपल्या शेतात कचरा गोळा करून पेटविला होता.
त्यावेळी साडीला आग लागल्याने त्या भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना शोभा सर्जे (मुलगी) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या शुक्रवारी पहाटे मयत झाल्या. अशी नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
● मुळेगाव दुचाकी अपघात; जखमीचा मृत्यू
मुळेगाव तांडा (ता.दक्षिण सोलापूर) येथे दुचाकी घसरून गंभीर जखमी झालेले शिवाजी गाजू राठोड (वय ६५) हे शासकीय रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी रात्री मयत झाले. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते दुचाकीवरून घराकडे निघाले होते.गावाजवळ दुचाकी घसरल्याने ते जखमी झाले होते. त्यांना कासु पवार (जावई) यांनी रुग्णालयात दाखल केले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● कंटेनरच्या खाली दुचाकी घुसली; एक ठार तर एक गंभीर जखमी
सोलापूर : अक्कलकोट वरून सोलापूरकडे विरुद्ध दिशेने येणारा कंटेनरच्या खाली सोलापूरहून कुंभारी कडे जाणाऱ्या दुचाकी थेट कंटेनर खाली घुसून एकाचा जाग्यावरच मृत्यू झाला.
तर दुसरा इसम गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. ही घटना गुरुवारी (ता. २३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर जवळील टाटा शोरूम समोर घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,पवन आणि विनीत असे दोघाचे नावे असल्याचे सांगण्यात आले. दोघेजण एकाच दुचाकीवरुन सोलापूरहुन कुंभारी कडे निघाले होते. त्यावेळी अक्कलकोटहून सोलापूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट कंटेनर खाली जाऊन त्या कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे.
घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करत अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले तर मयत इसमाचा मृतदेह शवविछेदनासाठी पाठवला आहे.
या घटनेची प्राथमिक नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून,रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
● कोर्टी येथे दुचाकी अडवून महिलेच्या पर्समधील रोकड लुटली; एकावर गुन्हा
पंढरपूर – दुचाकीवरून घराकडे जात असताना एका विवाहित महिलेला वाटेत अडवून तिच्या पर्समधील २ हजार रुपये लुटून नेल्याची घटना कोर्टी (ता.पंढरपूर) येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात पंढरपूर ग्रामीणच्या पोलिसांनी एका विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
अंजुम अफजल शेख (रा.कोर्टी) या आपल्या स्कुटी वरून घराकडे निघाल्या होत्या. त्यांच्या परिचयातील अब्दुल उर्फ बाळू अहमद मुलानी(रा.कोर्टी)याने त्यांची दुचाकी अडवली. आणि त्यांच्या पर्समधील २ हजार रुपये लुटून पसार झाला. अशी नोंद पोलिसात झाली. फौजदार गोदे पुढील तपास करीत आहेत.