Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

512 किलो कांदा विकून हातात पडला फक्त 2 रूपयाचा चेक

After selling 512 kg of onion, a check of Rs. 2 got in the hand, eyes watering Solapur Agricultural Produce Market Committee

Surajya Digital by Surajya Digital
February 25, 2023
in Hot News, शिवार, सोलापूर
0
512 किलो कांदा विकून हातात पडला फक्त 2 रूपयाचा चेक
0
SHARES
306
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

○ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मधील प्रकार

● कांद्याचे दर घसरल्याने बळिराजाच्या ‘डोळ्यात पाणी’

 

सोलापूर – सत्ता कोणत्याही पक्षाची असो शेतक-यांच्या पदरी कायमच निराशा पडते. खर्च जास्त अन् उत्पन्न कमी असेच शेतीचे गणित बनत चालले असून शेतकऱ्यांना शेती पिकविणे म्हणजे झुगार खेळल्या सारखे झाले आहे. After selling 512 kg of onion, a check of Rs. 2 got in the hand, eyes watering Solapur Agricultural Produce Market Committee अर्थसंकल्प असो अथवा निवडणुका फक्त शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्यांनी घोषणांचा पाऊस पडतो अन् पुढे काहीच होत नाही.

सध्या कांद्याला मिळणारा भाव कमी झाला आहे, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. असाच एक हताश झालेल्या शेतकऱ्यांची कांदा पट्टी व दोन रूपयाचा चेक सोशल मिडियावर खुप व्हायरल झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय ५८ वर्ष,रा. झाडी बोरगाव,बार्शी ) या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात १७ फेब्रुवारी २०२३ रोजी दहा पोत्यातून पाचशे बारा किलो कांदा विकला होता. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याला प्रतिकिलो १ रुपया प्रमाणे भाव मिळाला. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते. मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिला होता. चेकवर तारीख देखील ८ मार्च २०२३ दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यास दिलेली पट्टी आणि चेक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडली जातात आणि डोळ्यासमोर पीक करपून जातं. याकडे सत्ताधारी व विरोधकांचे लक्ष नसते. या घसरलेल्या दरामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून सरकारने तात्काळ लक्ष घालून योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

▪︎ काबाडकष्टाचे मोल कवडीमोल

बोरगाव येथून १० पोती कांदा विक्रीसाठी १७ फेब्रुवारी रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणले होते. यामध्ये ८ पोत्यांचे वजन ४०२ किलो भरले तर २ पोत्यांचे वजन ११० किलो भरले होते.कांद्याला दर प्रतिक्विंटल १०० रुपयांप्रमाणं प्रमाणे भाव मिळाला. (म्हणजे १ रूपया किलो )लिलाव झाला अन् पट्टी तयार करण्यासाठी आडत व्यापार्याने पावती पुस्तक काढले. एकूण बील ५१२ रुपये झाले.

 

 

हमाली,तोलाई,मोटारभाडे असे एकूण ५०९ रुपये खर्च झाले होते.५१२ रुपयांमधून ५०९ रुपये वजा केले असता,शिल्लक २ रुपये ४८ पैसे राहिले. बाजार समितीमधील नासिर खलिफा(सूर्या ट्रेडर्स) या व्यापाऱ्याने सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे दोन रूपयांचा चेकवर ८ मार्च २०२३ रोजीची तारीख देण्यात आली आहे. दोन रुपयांसाठी पुन्हा सोलापुरातील मार्केट यार्डात जावे लागणार आहे.असेच कवडीमोल दर मिळाल्यास जगणे अवघड होणार आहे आणि शेती न पिकविल्यास पोटाला खाणार काय ? असा प्रश्न पडला असल्याचे राजेंद्र तुकाराम चव्हाण (कांदा उत्पादक शेतकरी,बोरगाव ता.बार्शी.) यांनी सांगितले.

● कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले

 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक वाढली आहे. यामध्ये उत्तम दर्जाच्या कांद्याला आज देखील १ हजार रुपये ते १४०० रुपये भाव मिळत आहे. बारीक, चिंगळी, फकडी  या प्रकारच्या मालाला कमी दर प्राप्त होतो. राजेंद्र चव्हाण (झाडी बोरगाव,ता बार्शी) येथून आलेल्या शेतकऱ्याचा बारीक व चिंगळी प्रकारचा माल आणला होता, कांद्याच्या दर्जानुसार त्याला भाव मिळाला आहे.

 

नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्यास चेकने मोबदला दिला जातो.१७ फेब्रुवारी रोजी देखील २ रुपयांचा चेक देण्यात आला. कांद्याची आवक कमी झाली आणि मागणी वाढली तर खराब मालाला देखील भाव मिळत असल्याचे नासिर खलिफा (सुर्या ट्रेडर्स, सोलापूर) यांनी सांगितले.

 

Tags: #512किलो #कांदा #विकून #फक्त #2रूपयाचा #चेक #कृषीउत्पन्न #बाजारसमिती #शेतकरी#selling #512kg #onion #check #Rs.2 #hand #eyeswatering #Solapur #Agricultural #Produce #MarketCommittee
Previous Post

‘झाडू’ने घेतली ‘ मशाली’ ची भेट; ‘आप’ ने ‘मातोश्री’ गाठली थेट, युतीबाबत म्हणाले, ‘प्लीज वेट’

Next Post

बार्शी ते येरमाळा रोडवर अपघात; दुचाकी वरील जावई आणि सासू ठार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बार्शी ते येरमाळा रोडवर अपघात; दुचाकी वरील जावई आणि सासू ठार

बार्शी ते येरमाळा रोडवर अपघात; दुचाकी वरील जावई आणि सासू ठार

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697