मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ‘Broom’ took the gift of ‘Mashali’; ‘AAP’ reached ‘Matoshree’ directly, said about alliance, ‘Please wait’ Uddhav Thackeray Arvind Kejriwal यावेळी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील ठाकरेंची भेट घेतली.
समोर बलाढ्य शक्ती असतानाही दिल्लीचे तख्त राखणाऱ्या ‘झाडू’ ने शुक्रवारी मुंबईत आल्यानंतर वाट वाकडी करून थेट ‘मातोश्री’ गाठली. सत्तासंघर्षात सर्वकाही गेल्यानंतरही अस्मितेसाठी धडपडणाऱ्या ‘मशाली’ भेट घेतली. त्यानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास येऊ पाहत आहे. त्यासंदर्भातही ‘प्लीज वेट’ असा सूचक संकेत देत ‘शेवटी सत्याचाच विजय होईल’, असे सांगत ‘सोबत लढण्यासाठी नाही तर सोबत शिकण्यासाठी आलो आहे’, असे स्पष्ट करत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी उध्दव ठाकरे यांच्या ‘मशाली’ला साथ देण्याचे सूतोवाच केले.
शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी या दौऱ्यातून वेळ काढत त्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत महाराष्ट्रात आम आदमी पक्ष उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे संकेत दिले.
या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली असून ही भेट पूर्णतः राजकीय असल्याचे सांगण्यात आले. या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल ‘मातोश्री’वर कशासाठी आले आहेत? हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे सूचक विधान करून उध्दव ठाकरे यांनी भविष्यात ‘मशाल व झाडू’ एकत्र येणार असल्याचे घेतलेल्या भेटीनंतर घेतलेल्या संकेत भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दिले. कोरोना काळापासून उध्दव ठाकरे यांना भेटायची इच्छा होती. कोरोना काळात आम्ही एकमेकांपासून बरंच काही शिकत होतो.
उध्दव ठाकरे यांच्या सरकारने संपूर्ण राज्यासह मुंबईत कोरोनाला नियंत्रणात ठेवले. आम्ही दिल्लीकरांनी मुंबई आणि महाराष्ट्राकडून बरेच काही शिकलं आहे. कोविडच्या काळात हे सरकार अनेक सराव करत होते. ते सराव आम्हीही दिल्लीत करत होतो. त्यावेळी त्यांचे कार्य उल्लेखनीय होते, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एक पार्टी है जो 24 घंटे चुनाव की सोचती है
हम 24 घंटे चुनाव की नहीं सोचते
हम देश की सोचते हैं, देश के लोगों की सोचते हैं
☝️ महंगाई से परेशान गृहणी का सोचते हैं
☝️बेरोजगार युवा के बारे में सोचते हैंजब चुनाव आएंगे, तब चुनाव की सोचेंगे
—CM Arvind Kejriwal उद्धव ठाकरे जी के साथ pic.twitter.com/Avdzqo1pV6
— Vipin Arora (vicky) (@EleVickyAr) February 25, 2023
○ ते आम्हाला घाबरतात, म्हणून…
भाजपला फक्त गुंडगिरी येते. बाकी काही नाही. घाबरट लोक ईडी, सीबीआयचा वापर करतात. त्यांना आमची भीती वाटते, म्हणूनच ते याचा वापर करतात. आम्हाला फरक पडत नाही, सत्याचा विजय होणार आहे. आपण एकमेकांकडून काही शिकू, तेव्हाच आपला देश पुढे जाईल. आपल्याला एकमेकांसोबत लढायचे नसून शिकायचे आहे, असेही सूचक वक्तव्य केजरीवाल यांनी यावेळी केले.
○ ठाकरेंच्या भेटीत केजरीवाल म्हणाले…
– कोरोना काळात उध्दव ठाकरेंचे कौतुकास्पद काम.
– काही पक्ष 24 तास निवडणूकींचा विचार करतात.
– ठाकरेंच्या पक्षाचे नाव आणि चिन्हं चोरले.
– उध्दव ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल.
– शेवटी विजय हा सत्याचाच होतो.
– आम्ही बेरोजगार, शेतकरी, सर्वसामान्यांना विचार करतो.
– ईडी आणि सीबीआयचा वापर पळपुटे करतात.
– दिल्लीने कोरोना काळात मुंबईचे मॉडेल राबवले.
☆ शेवटी सत्याचाच विजय
मागील काही दिवसात महाराष्ट्रात खूप घडामोडी घडल्या असून अद्यापही घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली. त्यांचे चिन्ह आणि नाव चोरी करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते. हे वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार आहे. केव्हाही शेवटी सत्याचाच विजय होत असतो, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरेंना बळ दिले.
☆ निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचा विचार करू
देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास देशाचा विचार करतो. आम्ही देशातील प्रश्नांचा विचार करतो. पण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू. आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या पार्टीप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत, अशा शब्दात ‘ठाकरे गट- आप’ युतीबाबत केजरीवालांनी भाष्य केले.
☆ उद्योगपतींच्या फायद्यासाठी देश गहाण
केंद्र सरकार काही उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी देश गहाण ठेवत आहे. देशातील सर्व संस्थांची विक्री करत आहे. आता एलआयसी पण घाट्यात जाणार आहे. करोडो लोकांनी एलआयसीमध्ये साठवलेल्या पैशांचे काय होणार? देशात इतकी महागाई वाढली आहे की, लोकांना घरचा खर्च भागवता येत नाही. एकीकडे लोकांचा पगार वाढत नाही, दुसरीकडे त्यांच्या खर्चात मात्र मोठी वाढ होत आहे, अशी टीकाही केजरीवाल यांनी यावेळी केली.