Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अपक्ष आमदार म्हणून सत्यजीत तांबे काम करणार, काँग्रेसकडून मनधरणीबाबत बोलणे टाळले

Satyajit Tambe will work as an independent MLA, the legislature avoided talking about the protest

Surajya Digital by Surajya Digital
February 27, 2023
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
अपक्ष आमदार म्हणून सत्यजीत तांबे काम करणार, काँग्रेसकडून मनधरणीबाबत बोलणे टाळले
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आमदार सत्यजीत तांबेंनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी त्यांची भावी वाटचाल कशी असेल यावर भाष्य केले.  Satyajit Tambe will work as an independent MLA, the legislature avoided talking about the protest from the Congress मी अपक्ष आमदार आहे आणि मी अपक्षच राहणार. परिस्थितीनुसार जसे-जसे प्रश्न येत राहतील, त्याप्रमाणे निर्णय घेईन, असे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेसकडून मनधरणी करण्यात आली का? असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता यावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

 

नुकतेच संपूर्ण महाराष्ट्राने नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेले राजकारण पाहिले. त्यानंतर या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले सत्यजित तांबे हे निवडून आले. त्यानंतर आज आमदार म्हणून त्यांचा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. त्यांना यावेळी त्यांच्या भावी वाटचालीबद्दल आणि भाजपने दिलेल्या ऑफरच्या बातमीबद्दल विचारणा केली. यावर त्यांनी अपक्ष आमदार म्हणून काम करणार असल्याचे म्हटलय.

 

जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे.
माझे आई-वडील-मामा,माझे सर्व मित्र,माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशिर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे.#अर्थसंकल्पीय_अधिवेशन pic.twitter.com/uKVixo1Yyk

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 27, 2023

 

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, “मी अपक्ष आमदार आहे, आणि मी अपेक्षाच राहणार आहे. परिस्थितीनुसार जे प्रश्न समोर येतील, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. आज माझा पहिलाच दिवस आहे आणि तुम्ही माझ्यावर प्रश्नाचा भडीमार करत आहात. माझी भूमिका मी निश्चितपणे मांडेन मांडण्याचा प्रयत्न करेन. आज राज्यामध्ये अनेक प्रश्न असून तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक प्रश्न मला विधानसभेत मांडायचे आहेत.”

सत्यजित तांबे यांना काँग्रेसकडून फोन आला होता का? आणि नाना पटोले किंवा पक्षश्रेष्ठींकडून मनधरणीसाठी काही संपर्क करण्यात आला होता का? असे विचारल्यानंतर सत्यजित तांबे म्हणाले की, “सगळ्यांचेच निरोप आणि सगळ्यांचेच आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. योग्य वेळ आली की म्ही माझ्या मनातले सांगेन,” असे म्हणत थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 परिस्थिती पाहून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ : आमदार सत्यजित तांबे

 

सोलापूर : विधानपरिषद निवडणुकीत आपल्याला अनेकांची साथ मिळाली. त्यामुळे पुढील राजकीय भूमिका घेताना ज्यांनी मला साथ दिली, त्यांच्याबरोबर चर्चा करून आणि राजकीय परिस्थिती पाहून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे आ. सत्यजित तांबे यांनी सांगितले.

 

आ. तांबे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आ. तांबे पुढे म्हणाले की, सध्या नवीन युवक राजकारणात येत आहेत. त्यांना आजचे शिव्याशापाचे राजकारण कधीच मान्य होणार नाही. ज्यांनी वेगळे स्वप्न दाखवत दिल्लीत सत्ता मिळवली, त्यांचे नगरसेवकही आज एकमेकांवर धावून जाताना सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आजच्या युवकांनी राजकारणात कोणाचा आदर्श समोर ठेवायचा हा प्रश्न आहे.

 

आज जातीपातीचे राजकारणही वाढले आहे, त्याला आपला विरोध आहे. मुळात जात ही संकल्पनाच आपल्याला मान्य नाही, असेही ते म्हणाले. नामांतरणाच्या मुद्यावर तांबे म्हणाले की, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांकर ण करण्यात आले हे स्वागतार्ह आहे. मात्र केवळ नाव बदलण्यारून शहराचा विकास होणार आहे का याचाही विचार करण्याची गोष्ट आहे.

 

आ. सत्यजित तांबे यांनी शनिवारी ‘सुराज्य’ ला भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत व्यवस्थापकीय संपादक रोनित टोळ्ये यांनी केले. याप्रसंगी उपसंपादक विजय गायकवाड, अजित उंब्रजकर, मनोज कुलकर्णी, सुमित भोसले, विजयकुमार हत्तुरे, नितीन शिवशरण आदी.

 

यापूर्वी अनेक शहरांची नावे शासनाने बदलली आहेत, मात्र त्यानंतर तिथे वेगळे विकासाचे चित्र दिसले नाही. त्यामुळे विकासासाठी, रोजगारासाठी शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही आ. तांबे म्हणाले. पोटनिवडणुकीच्या विषयावर ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड आणि कसबा या दोन्ही पोटनिवडणुकीची समीकरणे वेगळी आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दृष्टीने ही निवडणूक भाजप आणि महाआघाडीसाठी या दोन्ही निकालाचा राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले.

 

● सोनिया गांधींचे केले कौतूक

 

सोनिया गांधींनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. त्याबाबत तांबे म्हणाले की, त्यांची काँग्रेस पक्षासाठी ऐताहासिक काम केले आहे. त्यांच्या कार्याळात सलग १० वर्षे काँग्रेसची सत्ता आली. अन्नसुरक्षा कायदा त्यांनीच आणला. ते उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी निवृत्ती घेतली याचे वाईट वाटते, असेही ते म्हणाले.

 

Tags: #SatyajitTambe #work #independent #MLA #legislature #avoided #talking #protest #Congress#अपक्ष #आमदार #विधिमंडळ #सत्यजीततांबे #काम #काँग्रेस #मनधरणी #बोलणे #टाळले
Previous Post

शेतकऱ्याची थट्टा भोवली; बाजार समिती खडबडून जागी झाली अन् केली व्यापाऱ्यावर कारवाई

Next Post

सोलापूर काँग्रेस भवनमध्ये दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर काँग्रेस भवनमध्ये दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

सोलापूर काँग्रेस भवनमध्ये दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697