● शहराध्यक्षांसमोरच घडला प्रकार
सोलापूर : काँग्रेसभवनमध्ये दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी (ता. २७) दुपारी चांगलीच हाणामारी झाली. विशेष म्हणजे हा प्रकार शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासमोरच घडला. संपूर्ण दिवसभर काँग्रेस भवनसह कार्यकर्त्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला. Clash between two senior office bearers in Solapur Congress Bhawan City President Chetan Narote
काँग्रेस भवनमध्ये नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळपासून कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू होती. शहराध्यक्ष चेतन नरोटेही आपल्या केबीनमध्ये बसून कार्यकर्त्यांची हितगूज करत होते. त्याचवेळी हॉलमध्ये काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आणि एका ब्लॉक अध्यक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आणि काहीकाळात त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी ब्लॉक
अध्यक्षाने शहर उपाध्यक्षाला चांगलीच मारहाण केल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार शहराध्यक्ष नरोटे यांना कळताच त्यांनी सोडवण्याचा प्रकार केला. मात्र तरीही दोघात हाणामारी सुरूच होती. शेवटी नरोटे यांनीच हे भांडण सोडवले. दुपारी झालेल्या या भांडणाची चर्चा सायंकाळपर्यंत काँग्रेस भवनमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. काँग्रेसभवनमधील कोणत्याही कमचाऱ्यांनी याची माहिती कोणाला दिली नाही. आम्ही बाहेर होतो, सुटीवर होतो, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून दिल्याची चर्चा होती.
● समजूत घालून भांडण सोडवले : नरोटे
दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमजुतीने वाद झाला. मात्र दोघांची समजूत घालून हा वाद सोडवला, यापुढे असे प्रकार करणे तुम्हाला शोभणारे नाही, असे सांगत वादावर पडदा टाकल्याचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर
सोलापूरच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या दिल्या होत्या सूचना
सोलापूर : सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर जिल्हाच्या दौऱ्यांवर येत आहे. शनिवारी – सकाळी त्यांचे शहरात आगमन होणार आहे.
नियोजन भवन येथे शहर जिल्ह्याच्या विकासाच्या आराखड्याचा आढावा घेणार आहेत. कोल्हापुर येथे नुकतीच महसुल परिषद झाली त्यानंतर प्रथम विखे- पाटील जिल्हाच्या दौऱ्यांवर येत आहेत. १३ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हाच्या दौऱ्यांवर पालकमंत्री आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीचा आढवा घेऊन शहर व जिल्ह्याची बलस्थाने ओळखून रोजगार व धार्मिक पर्यटनावर भर देत सोलापूर जिल्ह्याची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी सोलापूरच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या होत्या याचा आढवा घेण्याची शक्यता आहे.
तसेच चालू आर्थिक वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ५०२.९५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनासाठी १५१ कोटी रुपये, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनासाठी ४.२८ कोटी रुपये असा एकूण ६५८.२३ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. या प्रारूप आराखड्यास समितीसमोर सादर करण्यास मान्यता दिली.
तसेच अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादर करण्याच्या अनुषंगाने १६६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागण्यांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. आणखी निधी वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार होता याबाबतचा देखिल आढवा पालकमंत्री घेण्याची शक्यता आहे.