सोलापूर : शेत मोजणीसाठी वीस हजार लाचेची मागणी करणाऱ्या माढ्याच्या भूकरमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. Madhya’s bribe-taking land tax surveyor heard police custody torture forced labor court news
प्रशांत भारतराव कांबळे (पद – भूकरमापक,वर्ग-३, भूमी अभिलेख कार्यालय, माढा) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रशांत कांबळे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार यांची मौजे रोपळे (क.) येथील गट नं. ५४५ वरील शेत जमीनीची मोजणी झाल्यानंतर ती जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशा (क- प्रत) वर उपअधीक्षक यांची सही घेवून देण्यासाठी म्हणून भूमी अभिलेख कार्यालय, माढा येथील भुकरमापक प्रशांत भारतराव कांबळे हे वीस हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे दि.१० जानेवारी २०२३ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, यातील लोकसेवक प्रशांत कांबळे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या शेतजमिनीच्या जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशा (क-प्रत) यावर उपअधीक्षक, भूमीअभिलेख कार्यालय माढा यांची सही घेऊन देण्यासाठी वीस हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात लोकसेवक प्रशांत कांबळे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोनि, चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि,सोलापूर पोलीस अंमलदार- पो अं.पकाले, पोअं. किणगी, चालक पोअं. उडाणशिव (सर्व नेमणूक ला.प्र.वि,सोलापूर ) यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》बालिकेवर लैंगिक अत्याचार, आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी
● पाच हजार रुपये दंडाची शिक्षा
सोलापूर : नऊ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास विशेष न्यायाधीश व्ही पी आव्हाड यांनी तीन वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रदीप नागनाथ हुळ्ळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे यातील फिर्यादीची मुलगी ही शहरातील एका परिसरातील प्रोव्हिजन स्टोअर्स दुकानात दुधाची पिशवी आणण्याकरिता गेली होती त्यावेळी आरोपी प्रदीप याने त्या बाली केस दुकानात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिचा विनयभंग केला म्हणून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करून याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले होते. याची सुनावणी विशेष न्यायाधीश आव्हाड यांच्यासमोर झाली यात सरकार तर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी सरकारच्या वतीने ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड राम जाधव यांनी काम पाहिले. कोर्ट ऑर्डरली तांबोळी यांनी मदत केली. विशेष म्हणजे आरोपीला शिक्षा झाल्यानंतर आरोपीने न्यायाधीश आव्हाड यांच्या न्यायालयातच जामिनासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज देखील न्यायालयाने नामंजूर केला आहे.