Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

दक्षिण सोलापूरवर बाबा मिस्त्रींचा दावा; काँग्रेसची खेळी, दिलीप मानेंची वाट बिकट

Baba Mistry's claim to South Solapur; Congress's move, Dilip Mane's politics are waiting for him

Surajya Digital by Surajya Digital
March 1, 2023
in Hot News, राजकारण, सोलापूर
0
दक्षिण सोलापूरवर बाबा मिस्त्रींचा दावा; काँग्रेसची खेळी, दिलीप मानेंची वाट बिकट
0
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानभा मतदारसंघातून विधानसभा लढण्याची तयारी माजी आ. दिलीप माने यांनी सुरू केली आहे. त्यासाठी ते जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.  Baba Mistry’s claim to South Solapur; Congress’s move, Dilip Mane’s politics are waiting for him मात्र आता अचानक गतवेळी विधानसभा निवडणूक लढलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दक्षिणमधून आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे. बाबा मिस्त्री यांचे हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसचीच पर्यायाने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीच खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून आ. सुभाष देशमुख आणि बाबा मिस्त्री यांच्यात थेट लढत झाली होती. यामध्ये आ. देशमुख जरी विजयी झाले असले तरी चर्चा मात्र ६० हजारांच्या आसपास मते घेणाऱ्या बाबा मिस्त्री यांचीच झाली होती. दुसरीकडे २००९ आणि २०१४ मध्ये याच मतदारसंघातून दिलीप माने यांनी निवडणूक लढली होती. २००९ मध्ये ते विजयी झाले होते तर २०१४ मध्ये ते सुभाष देशमुखांकडून पराभूत झाले होते. २०१९ मधून त्यांनी शहर मध्यमधून निवडणूक लढवली होती. मात्र येथेही त्यांचा पराभव झाला होता. दक्षिणमधून न लढणे ही चूक लक्षात आल्यानंतर माने यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दक्षिणकडे वळवला आहे. ते आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

 

हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आघाडी जर झाली तर हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे माने यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माने हे ऐनवेळी पुन्हा काँग्रेसवासी होतील, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. मात्र आता त्यापूर्वीच काँग्रेसने एक नवी खेळी करत बाबा मिस्त्री यांना पुन्हा एकदा दक्षिणवर दावा करण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

दिलीप माने यांनी शहर मध्यमधून आ. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी माने यांच्याकडून शिंदे यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. ही बाब सुशीलकुमार शिंदे यांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यामुळे माने यांची राजकीय गोची करण्यासाठी  सुशीलकुमार शिंदे यांनीच बाबा मिस्त्री यांना दक्षिणवर दावा करण्यास सांगितल्याची चर्चा सुरू आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● यंदाही दक्षिणमधून इच्छुक : बाबा मिस्त्री

 

मागच्यावेळी आपण दक्षिणमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आपण सातत्याने या मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क ठेवला आहे. यंदाही आपण येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, असे बाबा मिस्त्री यांनी सांगितले.

● आ. शिंदेंचेही दक्षिण दौरे वाढले

 

आ. प्रणिती शिंदे यांनीही आपले दक्षिण मतदासंघातील दौरे वाढवले आहेत. त्यांनी माजी जि.प. सदस्य सुरेश हसापुरे यांच्यापाठीमागे ताकद लावली आहे. हसापुरे हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. एकंदरित काँग्रेसकडून दिलीप माने यांची गोची करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

● दिलीप मानेंच्या भूमिकेकडे लक्ष

 

माने यांनी अद्यापपर्यंत आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसचा हा डाव ओळखून दिलीप माने आता कोणता प्रतिदाव डाव टाकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Tags: #BabaMistry's #claim #SouthSolapur #Congress's #move #DilipMane's #politics #waiting #sushilkumarshinde#दक्षिणसोलापूर #बाबामिस्त्री #दावा #काँग्रेस #खेळी #दिलीपमाने #वाट #बिकट #राजकारण
Previous Post

गुप्तांग कापणाऱ्या तिघांना तीस वर्षांची जन्मठेप; खुनाच्या प्रयत्नात राज्यात प्रथमच सर्वात मोठी शिक्षा

Next Post

माढ्याच्या लाचखोर भूकरमापकास सुनावली पोलीस कोठडी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
माढ्याच्या लाचखोर भूकरमापकास सुनावली पोलीस कोठडी

माढ्याच्या लाचखोर भूकरमापकास सुनावली पोलीस कोठडी

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb   Apr »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697