पंढरपूर – घरासमोरील हौदामध्ये पडल्यामुळे तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील देगाव येथे घडली. Pandharpur | Child dies after falling into well in front of house while playing, Solapur
या घटनेमध्ये राजश्री मोहन घाडगे या तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. देगाव येथे राहणाऱ्या मोहन घाडगे यांची मुलगी राजश्री आज शुक्रवारी दुपारी घरासमोर खेळत होती. यावेळी घाडगे कुटुंबातील सदस्य शेतीच्या कामात व्यस्त होते. राजश्री ही खेळता खेळता घरासमोरील हौदात पडली त्यावेळी तिच्याकडे कोणाचेच लक्ष न गेल्यामुळे पाण्यात बुडून तिचा अंत झाला.
दरम्यान या घटनेमुळे घडगे कुटुंबावर शोक काळा पसरली असून देगाव मध्ये देखील हळहळ व्यक्त होत आहे.
》 लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणीशी नैसर्गिक व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून अत्याचार
सोलापूर : तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरून रोहित प्रकाश जाधव (वय-२५,रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित जाधव याने दि.२० फेब्रुवारी २०२२ ते १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत एका तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने सोलापुरात वेळोवेळी पीडित तरूणी विरोध करत असताना देखील त्या तरुणीशी नैसर्गिक व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला आहे, अशा आशयाची फिर्याद पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दराडे हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 रस्त्याच्या कडेला उभारणे शेतक-याच्या जीवावर बेतले; नागरिकांनी मोठमोठ्याने ओरडूनही उपयोग झाला नाही
सोलापूर : रस्त्याच्या कडेला थांबणे एका वृद्ध शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे.आनंदा विश्वनाथ गरड (वय 67 वर्ष, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मळी वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांना शेतक-याचा मृत्यू झालाय. या अपघाताप्रकरणी मळी टँकर चालकाच्या विरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता.2) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी टँकरचालकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम दयानंद गरड (वय २८) याने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अर्जुन सेनमारे (वय ३४, रा. नरखेड, ता. मोहोळ) या टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोकरे हे करीत आहेत. आनंदा विश्वनाथ गरड (वय ६७, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मयत आनंदा गरड हे रानमसले-बीबीदारफळ रोडवर रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी टँकरचालकाने आनंदा गरड यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येेथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. मयत आनंदा गरड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.
अपघात झाल्यानंतर १०० मीटरपर्यंत टँकरचालक तसाच पुढे निघून जात होता. नागरिकांनी मोठमोठ्याने ओरडून त्याला थांबविले. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी अपघातात जखमी झालेल्या आनंदा गरड यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले. घटनेनंतर संतप्त जमावाने टँकरच्या काचा, हेडलाईट फोडून संताप व्यक्त केला.