मुंबई : मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Attack on MNS leader Sandeep Deshpande; Discharged after treatment, see video
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज पहाटे जीवघेणी हल्ला झाला. चार ते पाच जणांनी संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडने हा हल्ला केला. त्यानंतर आता मनसेचे नेते संतोष धुरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘हा हल्ला पूर्वनियोजित होता. तसेच हल्लेखोर कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही. पण हा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आम्ही शोधून काढूच’, असेही ते म्हणाले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर त्यांना हिंदूजा रूग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांच्या हातावर प्लास्टर करण्यात आले. तसेच उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंनी रूग्णालयात जाऊन देशमुख यांची भेट घेतली होती.
मनसे नेते संदीप देशपांडे हिंदुजा रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर
हल्ल्यात देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत
राज ठाकरेंकडून संदीप देशपांडेंची विचारपूस@SandeepDadarMNS @mnsadhikrut #MNS #sandeepdeshpande #RajThackeray pic.twitter.com/zbB0LdWHxo
— Pallavi Gaikwad (@pallavig585) March 3, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या हाताला लागलं आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडलंय.
संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे. तसंच, शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या असा हल्ला झाल्याने दादरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून हा राजकीय हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतची अधिकची माहिती मिळणार आहे.
संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.
1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.