लातूर : लातूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर असे त्यांचे नाव आहे. Latur Chandrasekhar Patil committed suicide by shooting the brother of Shivraj Patil Chakurkar
चुलत बंधू चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील (वय ८०) यांनी आज रविवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चंद्रशेखर चाकूरकर पाटील यांनी आधीच आत्महत्या करण्याचा निश्चय केला असावा असं बोललं जात आहे. कारण त्यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना आपल्या कॉन्टॅक्टमधील लोकांना ‘गुड बाय’ असा मॅसेज केला होता.तर व्हॉट्सअप स्टेटसला देखील ‘गुड बाय’ असं लिहून पोस्ट केलं होतं. त्यानंतर स्वतःकडील असलेल्या पिस्तुलने गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज केला होता. शिवाय व्हॉट्सअॅपवर देखील त्यांनी ‘गूड बाय’ स्टेटस ठेवला होता.
वृद्धापकाळातील आजाराच्या मानसिक अवस्थेतुन त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज निकटवर्तीयांनी वर्तविला आहे. चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील चाकूरकर असं शिवराज पाटील यांच्या चुलत भावाचं नाव होतं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला आहे. मात्र चंद्रशेखर पाटील यांनी असा टोकाचा पाऊल का उचलला याबाबत आणखी अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. चाकूरकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या चुलत भावाने आत्महत्या का केली असावी, अशा चार्चाना उधाण आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
चंद्रशेखर उर्फ हन्मंत पाटील यांचे लातुरात माजी मंत्री चाकूरकर यांच्या निवासस्थानाजवळच घर आहे. ते दररोज वृत्तपत्र वाचन, चहासाठी चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी येत असत. रविवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे आले होते. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी गोळी झाडून घेतली.
चंद्रशेखर पाटील यांचे कुटुंब सधन, समाधानी म्हणून परिचित आहे. दोन्ही मुले वकील आहेत. कौटुंबिक वातावरण आणि सार्वजनिक जीवन उत्तम राहिले आहे. त्यांचे पुत्र वकील लिंगराज पाटील तातडीने घटनास्थळी आले. शैलेश पाटील चाकूरकर यांना घरातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तेही धावत आले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला. आत्महत्येमागचं कारण काय, याबाबत माहिती घेतली जात आहे. चंद्रशेखर पाटील हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. त्यांचं वय 81 वर्ष असून ते शेती करत होते. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे बंदुकीचा परवाना देखील होता, अशी माहिती मिळत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते, असं देखील कळतंय.
शिवराज पाटील हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी सक्रिय राजकारणात असताना काँग्रेसमध्ये विविध पदे भूषविली आहे. त्यांनी देशाचं केंद्रीय गृहमंत्रीपद देखील भूषविले आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याच्या चुलत भावाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.