मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंब, शिवसैनिक व पोलिसांसमवेत रंगपंचमी साजरी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज मुंबईत होळी साजरी केली. Chief Minister, Deputy Chief Minister celebrated Rang Panchami Devendra Fadnavis Eknath Shinde Shiv Sena तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी होळी आणि धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. नातू रुद्रांशसोबत रंग खेळताना ते या व्हिडीओ देखील समोर आला आहे.
टेंभीनाका येथील आनंद आश्रमाला शिंदेंनी भेट दिली. धर्मवीर आनंद दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर आनंद आश्रमात उपस्थित असलेल्या शिवसैनिकांसोबत शिंदेंनी रंगपंचमीचा आनंद घेतला. शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे व नातवालादेखील रंग लावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांसोबत रंगपंचमी साजरी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज तिवारी व इतर नेते रंगपंचमीसाठी उपस्थित होते. फडणवीस यांनी पत्रकारांनाही रंग लावून आनंद साजरा केला. त्यानंतर त्यांचे नागपुरात भव्य स्वागत करण्यात आले. मंचावर केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धुळवडीच्या दिवशी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आमच्या मित्राला कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती त्यामुळे कोणी रडत होतं, कुणी गात होतं. असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा, संगीताची नशा करावी, कामाची नशा करावी. होळीच्या दिवशी सर्व विरोधकांना आम्ही माफ केलं, विरोधकांच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही कटुता नाही, हाच आमचा बदला आहे’, असे फडणवीस म्हणाले.
धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ !#HappyHoli #Holi2023 #होली pic.twitter.com/fDEi02Pfa0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 7, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहत. त्यांची मुलगी दिवीजा फडणवीस आणि त्यांचा पाळीव पोपट यांच्यासोबतचच्या दोन व्हिडीओ क्लीप शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी “धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ!” असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.
□ पन्नास खोक्यांची अनोखी होळी
शिंदे गटाला डिवचण्यासाठी “पन्नास खोके एकदम ओके.” अशी घोषणा दिली जाते. असाच पन्नास खोक्यांचा किस्सा मुंबईतील विलेपार्लेच्या बामणवाडा येथे घडला आहे. येथील नवयुग तरुण मंडळाने महागाईच्या पन्नास खोक्यांचा मनोरा रचत होळी साजरी केली आहे. यातील प्रत्येक खोक्यावर भेडसावत असलेले प्रश्न मांडण्यात आले होते. होळीच्या निमित्ताने केलेल्या या राजकीय टोलेबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
□ होळी खेळून नदीवर गेलेल्या तरुणाचा बूडून मृत्यू
पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या जळगावच्या तरुणाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू झाला आहे. जयदीप पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. जयदीप रंग खेळून वराळे हद्दीतील इंद्रायणीत हात पाय धुण्यासाठी गेला असता, पाय घसरुन तो पाण्यात पडला. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी तळेगाव MIDC पोलिसांना माहिती दिली. 2 तासांच्या शोधमोहिमेनंतर जयदीपचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.