● पहिल्या दिवशी बलात्कार, दुसर्या दिवशी सत्तूरने वार
सोलापूर /विशेष प्रतिनिधी
इयत्ता बारावीमध्ये शिकणारी 17 वर्षांची मुलगी. ट्युशन संपवून घरी जात असताना मोटारसायकलवरून पाठलाग करणार्या दोघांपैकी एकाने अडवून तिच्यावर बलात्कार केला. Barshi city police remained heedless, innocent accused fatally attacked minor victim Solapur त्याची फिर्याद दाखल होऊन चोवीस तास उलटल्यानंतर पुन्हा त्याच दोन आरोपींनी पिडितेच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार करत तिच्यावर खुनी हल्ला केला. त्याची दुसरी फिर्यादही दाखल झाली. पहिली फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे मोकाट फिरणार्या आरोपींनी दुसरा गुन्हा केला. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतरच तात्काळ पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर खुनी हल्ल्याची घटनाच घडली नसती, अशी भावना बार्शीकरांमधून व्यक्त होत असून शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
हा प्रकार बळेवाडी (ता. बार्शी) येथील एका अल्पवयीन मुलीसोबत घडला आहे. सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या संबंधित मुलीवर दि. 5 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे दि.6 मार्च रोजी रात्री त्याच आरोपींनी पिडीत मुलीवर तिच्या घरात घुसून कोयता आणि सत्तूरने वार केले. त्यानंतर तिसर्या दिवशी म्हणजे दि. 7 मार्च रोजी बार्शी शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती रात्री उशिरा दिली. अक्षय विनायक माने (वय 23) आणि नामदेव सिध्देश्वर दळवी (वय 24, दोघेही रा. बळेवाडी, ता. बार्शी) अशी आरोपींची नावे असल्याचे बार्शी शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.
● पाठलाग करून अडवले आणि केली बळजबरी
पिडीत मुलगी रविवारी बार्शी येथे ट्युशनसाठी आली होती. ट्युशन संपवून स्कुटीवरून परत गावाकडे जात असताना अक्षय माने आणि नामदेव दळवी या दोघांनी तिचा मोटारसायकलवरून पाठलाग सुरू केला. रेल्वे रूळ ओलांडून कासारवाडीजवळ आल्यानंतर पिडितेच्या स्कुटीला मोटारसायकल आडवी लावून तिला थांबवले. त्यानंतर दोघांपैकी एकाने तिला ओढत नेऊन बाजूच्याच शेतामध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही आरोपी पळून गेले. पिडितेने घरी जाऊन हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे गाठून आरोपींविरूध्द फिर्याद दिली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम 376,354,341,323, 504,506,34 नुसार दोन्ही आरोपींविरूध्द दि. 5 मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल केला. तपास महिला फौजदार सारिका गटकूळ करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ घरात घुसून केला खुनी हल्ला
इकडे बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असताना तिकडे आरोपी गावात मोकाट फिरत होते. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे 6 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी बोलावल्यामुळे पिडितेचे आईवडील पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पिडीत मुलगी घरी होती. तीच संधी साधून अक्षय माने व नामदेव दळवी यांनी तिचे घर गाठले. तिच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार केले. त्यात तिच्या हाताची दोन बोटे तुटली असून ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी त्याच दोन्ही आरोपींविरुध्द बार्शी शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 307,324,326,452,506,34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पुढील तपास करीत आहेत.
□ बार्शी शहर पोलिसांचा हलगर्जीपणा नडला
रविवार दि. 5 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बलात्काराची घटना घडली. पिडितेने दोन्ही आरोपींची नावे बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देतानाच सांगितली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी आरोपींना अटकेबाबत गाफीलपणा दाखवला. आरोपी हे गावातच असताना त्यांना त्वरित अटक केली नाही. परिणामी दुसर्या दिवशी दि.6 मार्च रोजी रात्री आठनंतर त्याच आरोपींनी पिडितेवर घरात घुसून खुनी हल्ला केला. पोलिसांनी घटना घडल्यानंतर लगेचच रात्री किंवा दुसर्या दिवशी दिवसभरात आरोपींना अटक केली असती तर खुनी हल्ल्याची दुसरी घटना घडलीच नसती, असा आरोप आता पोलिसांवर होत आहे.