सोलापूर : ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानाअंतर्गत कॉंग्रेसचे नेते सामान्य जनतेकडे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. A democracy does not have the dictatorship of a prime minister; come Praniti Shinde visits Prime Minister Narendra Modi in Solapur याचा एक भाग म्हणून कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या एका कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “लोकशाही ही लोकांची शाही असते. लोकांची हुकुमशाही असते. कोणत्याही पंतप्रधानांची हुकुमशाही नसते”, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
लोकशाहीत लोकांचीच हुकूमशाही चालत असते, कोणत्या पंतप्रधानांची नाही, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. काँग्रेस पक्षाने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सामान्य जनतेच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून क प्रणिती शिंदे सोलापुरातील एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना त्या पुढे म्हणाल्या, काही दिवसांनी आम्ही घरोघरी जाऊन कुणाचे रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अपंग दाखला किंवा जन्म दाखला अशी सगळी कामे करणार आहोत. हेच ते ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ आहे. निवडणुका असो वा नसो, काँग्रेस आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या सुख-दुःखात आम्ही सोबत असू, कदाचित निवडणुकांमध्ये आम्ही येणार नाही. पण सुखा दुःखात तुम्हाला जेव्हा मदत हवी असेल तेव्हा आम्ही मदतीला धावून येऊ.
आम्ही मदतीला नाही आलो, तर आमचा कान धरून आम्हाला खाली बसवा. तो तुमचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा तो अधिकार आहे. कारण ही लोकांची शाही आहे, लोकशाही आहे. ही लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही. आम्ही तुमचे नोकर आहोत. मी आमदार माझ्या घरी असेन. पण इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नोकर आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा मोठे नाहीत, हे तुम्ही कधी विसरू नका. घाबरू नका. ताठ मानेने जगा, असेही त्या म्हणाल्या.