सोलापूर : महिला दिनी ‘नारी शक्ती’चे बरेच गुणगान गायिले जाते. या शक्तीने आज कुठली क्षेत्रे पादाक्रांत केलेली नाहीत, असे विचारवंत नेहमीच बोलत असतात. When will there be a woman Chief Minister in progressive Maharashtra? Come on Women’s Day. Praniti Shinde is also proud of Ajit Pawar’s weakness थोडक्यात सांगायचे झाल्यास महिलांनी सारीच क्षेत्रे काबीज करून तिथे आपली मक्तेदारी निर्माण केली आहे पण या शक्तीला अजून काही तरी हवे आहे. तिच्या मनात दडलेली अपेक्षा बुधवारच्या महिला दिनी प्रकट झाली. त्यातून पुरूषप्रधानकीला नक्कीच हादरा बसलेला असणार.
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन जवळपास ६३ वर्ष पूर्ण झाली पण सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही मुख्यमंत्रिपदी महिला बसलेली नाहीये. प्रस्थापित पुरुष राजकारण्यांच्या वर्मावर बोट ठेवत सोलापूरच्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी ही खंत विधानसभेत बोलून दाखवली.
खातेवाटप होताना महिलांना दुय्यम दर्जाची खाती दिली जातात. पण महिलांना अर्थ, नगरविकास, महसूल अशी खाती ज्यादिवशी दिली जातील, किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ज्यादिवशी महिला असेल, तोच खरा महिलादिन असेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहातील सर्वपक्षीय इतर नेत्यांनी महिला आमदारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच बुधवारी विधानसभा कामकाजात महिला लोकप्रतिनिधींना प्राधान्य देण्यात आले असून त्यानुसार कामकाज पत्रिकेत सर्वपक्षीय महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला ठेवण्यात आल्या होत्या. याच वेळी भाषण करताना शिंदे यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.
आपल्या देशाला पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या, जे अजून अमेरिकेलाही जमले नाही. म्हणजेच महिला धोरणात अमेरिका अजूनही मागासलेली आहे. महिला व बालकल्याण जरी पुरुषाला दिले नसेल तरी महिला व बालविकासच महिलेला दिले जाते, अशा गोष्टी नसायला पाहिजेत. पण ज्या दिवशी महिलांना अर्थ, नगरविकास, महसूल किंबहुना मुख्यमंत्रिपद मिळेल, तोच दिवस खऱ्या अर्थाने आम्हा महिलांसाठी महिला दिन असेल, असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
□ फूल भी है, और चिंगारी भी…
महिला समान हक्क मागताहेत. फूल भी हैं और चिंगारी भी हैं… हम भारत की नारी आहे, असे असतानाही जर पुरोगामी महाराष्ट्रात ते हक्क आम्हाला मिळत नसतील तर महिला दिन साजरा करून काय उपयोग आहे? असा सवालही प्रणिती शिंदे यांनी विचारला. लोक काय म्हणतील, हा महिलांच्याबाबतीतला विचार समाजाने दूर सारायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आपण महिला धोरण म्हणतो, आर्थिक धोरण किंवा सामाजिक धोरण म्हणतो पण जोपर्यंत त्यांच्या बाबतीतलं मानसिक धोरण आपण बदलत नाही तोपर्यंत सरकारने केलेले कायदे फक्त कागदावरच राहतील, ते प्रत्यक्षात येणार नाही, असे त्यांनी निःक्षून सांगितले.
□ ठराव मांडणार
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आधुनिक महिला धोरण तयार करण्याचा ठराव मांडणार आहेत. राज्य सरकारचे १९९४, २००२, २०१४, २०१९ चे प्रस्तावित धोरण तसेच २००१ चे राष्ट्रीय महिला धोरण यांचे एकत्रीकरण करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण तयार करण्याबाबत सरकारी पातळीवर उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचा हा ठराव असणार आहे, असेही त्यांनी सूचित केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही, हे कमीपणाचे – अजित पवार
जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रम सुरु असताना, महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही, हे थोडेसे कमीपणाचे आहे. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गाला योग्य वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.
बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सर्व महिलावर्गांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, अजूनही मंत्रीमंडळाचा विस्तारही झाला नसल्याचे सांगत त्यांनी टीका केली.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, ते कसे भरून काढणार? असा प्रश्न विचारत अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, विरोधकांनी याबाबत पुन्हा एकदा विधानसभेत सभात्याग केला.