सोलापूर – उपळे दुमाला (ता.पंढरपूर) येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीसात देऊन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर तिघांनी मिळून कोयत्याने हल्ला केला. Coyote attack on Pandharpur Upazila Hospital; Three injured, including woman; Crime against three women doctor molestation त्यात महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमर्जन्सी वार्ड जवळ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात पंढरपूर शहरच्या पोलिसांनी तिघा सख्या भावाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात सुजाता सचिन इंगळे (वय ३४ रा. पुणे सध्या रा.पंढरपूर) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी साहिल दयानंद उर्फ जयाजी आव्हाडे, शुभम दयानंद आव्हाडे, आणि हर्षल उर्फ सोनी दयानंद आव्हाडे (सर्व रा. शेगाव दुमाला ता.पंढरपूर) या तिघाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सोमवारी सकाळी शेगाव दुमाला येथील एका कार्यक्रमात मोबाईल वरून व्हिडिओ काढण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्याची तक्रार देण्यासाठी सुजाता इंगळे यांच्यासह तिघेजण पंढरपूर तालुका पोलिसात गेले होते. तक्रार दिल्यानंतर ते सर्वजण उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले होते.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या गेट जवळ वरील तिघांनी मिळून कोयत्याने मारहाण केली. त्यात सुजाता इंगळे, त्यांचे पती सचिन इंगळे आणि अनिल इंगळे असे तिघेजण गंभीर जखमी झाले. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सोनवलकर करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरात महिलादिनी महिला डॉक्टरची डॉक्टरच्या विरोधात तक्रार; पशुचिकित्सक दवाखान्यात महिला डॉक्टरचा विनयभंग
सोलापूर : सोलापुरातील एका पशुचिकित्सक दवाखान्यात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने तेथेच कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरांच्या विरोधात विनयभंग, दमदाटी केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी या महिला डॉक्टर असून,त्यांच्याच दवाखान्यात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बागवान यांनी गेल्या महिनाभरापासून आपणाकडे पाहून अश्लील गाणी लावणे,शेरेबाजी करणे,शरीराला स्पर्श करणे असे प्रकार केले होते. त्यात पुन्हा त्यांनी ६ मार्च रोजी अशाच प्रकारे आपल्याबरोबर वागणूक केल्याने त्या महिला डॉक्टरने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात विनयभंग व दमदाटी केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.