पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिरात विनामुल्य सेवा देण्याची इच्छा अनेकदा व्यक्त करण्यात येत होती. पांडुरंगाच्या दर्शनाची आणि सेवेची ओढ असणाऱ्यांसाठी मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. Vitthal Seva Mandir Samiti which can be done by worshipers in Pandharpur Vitthal Temple आता विनामुल्य सेवा देण्याची इच्छा असलेल्या वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरात वर्षभर सेवा देता येणार आहे. या निर्णयाचे वारकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरेंनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
येथील श्री विठ्ठल मंदिरात विनामूल्य सेवा देण्याची इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून व्यक्त केली जात होती. भाविकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार मंदिर समितीकडून होताना दिसतोय. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी याबाबत संकेत दिल्याने वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तात खुशीचे वातावरण आहे.
आम्ही मोफत देवाची सेवा करण्यास तयार असल्याच्या भावना विठ्ठल भक्तातून व्यक्त होत आहेत. राज्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्यासह गोंदवलेकर महाराज आणि इतर अनेक देवस्थानात भाविकांच्याकडून विनामूल्य सेवा देण्याची व्यवस्था कार्यरत आहे. यामध्ये अधिकारी, व्यापारी यांचेसह सर्वसामान्य भाविक मोफत सेवा देत असतात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील वारकऱ्यांच्याप्रती सेवा भाव दाखवत अशी सेवा देण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती. अशा पद्धतीची सेवा करण्याची संधी मिळाल्यास राज्यभरातील अनेक गवे आणि विविध धार्मिक संस्थांकडून ही मोफत सेवा देण्याची तयारी दाखवण्यात येत आहे.
सध्या विठ्ठल मंदिरात २७२ कर्मचारी आणि शेकडो हंगामी कर्मचाऱ्यांच्या मदतीने विठ्ठल मंदिर प्रशासन सेवा आहेत. आता मंदिर प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर मोफत विठ्ठल सेवेचा देण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. हा निर्णय घेतल्याने विठ्ठल भक्तांकडून वारकऱ्यांना चांगली वागणूक तर मिळेल याशिवाय मंदिराकडे येणार पैसे भाविकांच्या विकास कामासाठी वापरता येणार आहे.
दरम्यान, मोफत सेवा बजावण्यास महिलावर्ग देखील उत्सुक आहे. मंदिर समितीने शासनाच्या मदतीने मोफत सेवा पद्धतीची सेवा सुरू केल्यास विठ्ठल मंदिर खर्या अर्थाने विठ्ठल भक्तांच्या ताब्यात येणार आहे. विठ्ठल मंदिर, दर्शन व्यवस्था, अन्न छत्र, परिवार देवता अशा ठिकाणी भाविकांची मोफत सेवा वापरता येणार आहे. अशा पद्धतीची सेवा करण्याची संधी मिळाल्यास राज्यभरातील अनेक गावे, विविध धार्मिक संस्थांकडूनही मोफत सेवा देण्याची तयारी दाखवण्यात येत आहे.
● मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय करणार : ठोंबरे
भाविकांनी श्री विठ्ठल सेवा करण्याची मागणी केली तर त्यासाठी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. भाविक किती दिवसांची सेवा देणार यावरून व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले.