》 कामाची गरज म्हणून सहन केला अत्याचार
सोलापूर : चित्रपट ‘भाऊचा धक्का’, त्याची कार्यशाळा होती गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उस्मानाबाद जवळच्या येडशी या गावी. त्या कार्यशाळेला आलेल्या एका तरुणीवर चित्रपटाच्या दिग्दर्शक भाऊची पडली नजर. मग त्या पट्ट्याने त्या तरुणीला चित्रपटात चांगला रोल देण्याची दाखवले आमिष. तिला स्वतःच्या खोलीवर बोलावून घेतले. Solapur. Director ‘Bhau’ gave the girl a ‘casting couch’ ‘shock’ Barshi Pangri Ahmednagar Madha Yedshi मोठी अभिनेत्री व्हायचे असेल तर ‘ हे ‘ सहन करावेच लागेल, असे सांगून त्याने केली तिच्याशी लगट. तब्बल सहा महिने हा प्रकार चालूच होता. शेवटी ती तरुणी वैतागली. तिने धाडस करून पांगरी (ता. बार्शी) पोलीस ठाणे गाठले आणि दिग्दर्शक भाऊवर ‘कास्टिंग काऊच’ प्रकरणी बलात्काराची फिर्याद दिली.
संजय उत्तमराव पाटील (वय ५०, रा. गणराज कॉलनी, सन फार्माजवळ, बोलेगाव फाटा, नागापूर एमआयडीसी, अहमदनगर) असे त्या दिग्दर्शक भाऊचे नाव आहे. ‘भाऊचा धक्का’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव असून हा संपूर्ण प्रकार उक्कडगाव (ता. बार्शी) येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात घडला आहे. अत्याचारग्रस्त तरुणी ही मूळची माढा तालुक्यातील असून सध्या ती पालघर परिसरात राहते. चित्रपटाच्या कार्यशाळेसाठी ती येडशी येथे आल्यानंतर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक जायपत्रे पुढील तपास करीत आहेत.
● कार्यशाळा येडशीला, मुक्काम उक्कडगावला
गेल्या वर्षी म्हणजे २० सप्टेंबर २०२२ रोजी ‘भाऊचा धक्का’ या चित्रपटाची कार्यशाळा येडशी (जि. उस्मानाबाद) येथे सुरू होती. त्यावेळी चित्रपट कंपनीचा मुक्काम हा उक्कडगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील एका महाविद्यालयाच्या प्रांगणात होता. अत्याचारग्रस्त तरुणी ही पालघर येथून या चित्रपटाच्या कार्यशाळेसाठी येडशीला आली होती. कार्यशाळा संपल्यानंतर दिग्दर्शक संजय पाटील याने कास्टिंग काऊचजा हा प्रकार संबंधित तरुणीसोबत केला.
● असे झाले कास्टिंग काऊच
चित्रपट कंपनीचा मुक्काम असलेल्या उक्कडगाव येथील महाविद्यालयाच्या प्रांगणातील खोलीवर दिग्दर्शक संजय पाटील याने पीडित तरुणीला बोलावून घेतले. त्याठिकाणी पहिल्यांदा त्याने तिच्याशी स्वतःच्या लगट करायला सुरुवात केली. तुला चित्रपटात चांगली भूमिका देता, त्यासाठी तुला हे सारे करावेच लागेल, असे आमिष दाखवून तिच्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
● कामाची गरज म्हणून सहन केला अत्याचार
दरम्यान, अत्याचारग्रस्त तरुणीला चित्रपटातील कामाची गरज होती. जर तिने तक्रार केली असती तर दिग्दर्शक भाऊने तिला चित्रपटातून काढून टाकले असते. या दबावाखाली तिने यासंदर्भात तक्रार करण्याचे धाडस केले नाही. मात्र दिग्दर्शक भाऊचा अत्याचार वाढतच चालल्याने शेवटी वैतागून तिने पांगरी पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. मात्र अद्याप आरोपीला अटक झाली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरात माजी नगरसेवक पुत्रावर पोलिसाची कारवाई
पिस्तूल घेऊन स्टंटबाज करणे आले अंगलट
सोलापूर : येथील सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.३ परिसरात एका नगरसेवक पुत्राने हातात पिस्तुल घेवून मोटारसायकलवर स्टंटबाजी करीत व्हिडिओ काढून सोशल मिडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवार, दि. १२ मार्च रोजी घडली.
चेतन नागेश गायकवाड, राजु भंडारी (दोघे रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.३,) यातील चेतन गायकवाड याने त्याच्या लाल रंगाच्या बुलेट मोटारसायकलवर हात सोडून विविध हातवारे करून हातात पिस्तुल घेवून स्टंटबाजी करीत मोटारसायकल चालवत त्याचा व्हिडिओ राजु भंडारी याने काढून तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला.
आरोपीने शस्त्रपरवाना नसताना पिस्तुल बाळगुन व्हिडिओ काढून लोकांमध्ये दहशत पसरवत फेसबुक स्टोरी यावर प्रसारीत केल्याची फिर्याद पोलीस हवालदार सतीश भास्कर शिंदे यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.