मोहोळ / सोलापूर : मोहोळचे तत्कालीन आमदार तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश नागनाथ कदम यांना गुरुवारी (ता. 16) मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलकावर जामीन मंजूर केल्याने मोहोळ मध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला. Former MLA Ramesh Kadam granted bail, but it will take time to come out Annabhau Sathe Corporation Mohol Solapur
दरम्यान माजी आमदार कदम यांना अन्य प्रकरणांमध्ये अटक असल्याने त्याना तुरूंगातुन बाहेर येण्यास वेळ लागणार आहे. त्यांना जेलमध्येच थांबावे लागणार आहे. कदम यांनी तपासात सहकार्य करावे, सोबतच मुंबई-ठाणे हद्द सोडून न जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मोहोळ चे माजी आमदार रमेश कदम हे मागील सात आठ वर्षापासून अपहार प्रकरणी जेलमध्ये होते. रमेश कदम यांनी मोहोळ विधमसभा मतदार संघात मागेल त्याला पाणी ही योजना राबवून पाणी टंचाई शासनाच्या मदतीशीवाय दूर करण्याचा प्रयत्नही केला होता. आधी रस्ते करा मगच वाळू वाहतुक करा म्हणत कलेक्टर कचेरीवर काढलेला मोर्चा चांगला गाजला होता.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्यावर केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्व केसचा निपटारा झाल्याने उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असल्याचे त्यांच्या समर्थकाकडून सांगितले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रमेश कदम यांना जामीन मंजूर केल्याची बातमी न्यूज चैनल वरून प्रसारित होताच त्यांच्या समर्थकांनी मोहोळ येथे नगर परिषदेसमोर फटाक्याची आतषबाजी, घोषणाबाजी करत जल्लोष केला. यामध्ये प्राध्यापक दिनेश घागरे, विनोद कांबळे, बाळासाहेब जाधव, दिनेश माने, सुधीर खंदारे, दादाराव पवार, अप्पू बिराजदार, जयपाल पवार, सुदर्शन खंदारे, मेजर लोखंडे आदी सह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३,७०० पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला होता. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला होता. या प्रकरणी कदम यांना ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.
पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसानी त्यांना भायखळ्याच्या पुरुष कारागृहात हलवण्यात आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले. डिसेंबर २०१८ मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचे संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यानच्या काळात एका व्हिडिओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड कारागृहात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचे दिसले होते. त्या संदर्भात कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
मात्र, पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि २५ हजारांची लाच मागितली, असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा कारागृहात असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. परंतु, मागील वर्षी मार्च महिन्यात कदम शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त झाले. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे.
महामंडळाने कोणतीही प्रक्रिया न राबवता ७३ जणांची भरती केली, धाराशिव (उस्मानाबाद) नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतले, नियुक्त झालेल्यांना २० लाखांचे गृह कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातील १५ लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले. अनेक कर्ज प्रकरणांवर खोट्या सह्या घेतल्या, लाभार्थींचे धनादेश परस्पर वाटण्यात आले, महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला ५ कोटी कागदोपत्री वाटण्यात आले, विधानसभा निवडणुकीत कदमांनी ६ कोटी ५६ लाख रुपये वाटले, अशा घोटाळ्यांचा समावेश आहे.