Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

ति-हे रोडवर का पिकपच्या धडकेने दुचाकी चालक ठार

A two-wheeler driver was killed in a collision with a pickup truck on Ti-Ha Road, Solapur

Surajya Digital by Surajya Digital
March 17, 2023
in Hot News, सोलापूर
0
ति-हे रोडवर का पिकपच्या धडकेने दुचाकी चालक ठार
0
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : सोलापूर वेगाने जाणाऱ्या पिकअपच्या धडकेने दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात सोलापूर ते मंगळवेढा रोडवरील समृद्धी हॉटेल जवळ गुरुवारी (ता.16) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. A two-wheeler driver was killed in a collision with a pickup truck on Ti-Ha Road, Solapur

 

अमोल नारायण फडतरे (वय ३५ रा. जामगाव ता. मोहोळ) असे मयत झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीवरून जामगाव ते सोलापूरकडे निघाले होते. समृद्धी हॉटेलजवळ कांद्याची वाहतूक करणाऱ्या पिकपची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पवन थोरात (मावस भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले. या अपघातात पिकअप उलटल्याने रस्त्यावर कांदा विखुरला होता. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

 

● भोगाव वृद्धाश्रमातील विहीरीत एकाची आत्महत्या

सोलापूर – वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका ५३ वर्षीय इसमाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना भोगाव (ता.उ. सोलापूर) येथील आधार वृद्धाश्रमात आज गुरुवारी दुपारी उघडकीस आली .

बाळासाहेब रतनलाल लाहोटी (वय 53 रा. अंत्रोळी ता. दक्षिण सोलापूर) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. तो काही दिवसापासून आधार वृद्धाश्रमात राहण्यास होता. गुरुवारी (ता.16) दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह वृद्धाश्रमाच्या आवारात असलेल्या विहिरीतील पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदत खवतोडे पुढील तपास करीत आहेत .

● रामवाडी येथे अनोळखी तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

 

सोलापूर – रामवाडी परिसरातील नागोबा मंदिराजवळ असलेल्या चिलारीच्या झाडाला एका ३० वर्षीय अनोळखी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.15) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली .

मयत अनोळखी हा रंगाने सावळा असून त्याच्या अंगावर लाल टी-शर्ट आणि निळी जीन्सची पॅन्ट आहे . या संदर्भात कोणाला माहिती असल्यास त्यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार न्यामने यांच्याशी संपर्क साधावा.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ बाणेगाव येथे दिवसा घरफोडी; रोख रकमेसह २ लाख ७३ हजाराचे दागिने लंपास

सोलापूर – बाणेगाव (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या एका महिलेच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटून चोरट्याने कपाटातील रोख रकमेसह २ लाख ७३ हजाराचे दागिने पळविले. ही चोरी बुधवारी (ता.15) दुपारच्या सुमारास घडली.

यासंदर्भात रतन अशोक घाडगे (रा.बाणेगाव)यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली. चोरट्याने खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश केला.आणि कपाटातील ७३ हजार रुपये रोख आणि ४० ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास फौजदार निंबाळकर करीत आहेत.

□ मसले चौधरी येथे कुऱ्हाडीने मारहाण; वृद्ध जखमी

सोलापूर : मसले चौधरी (ता. मोहोळ) येथे कुऱ्हाडीने केलेल्या मारहाणीत रोहिदास दगडू हेळकर (वय ७७) हे जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी ज्ञानेश्वर (मुलगा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना विलास क्षीरसागर याने विनाकारण मारहाण केली. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

》 आरटीओ अधिकाऱ्यावर हल्ला; शेतकरी पुत्रास अटकपूर्व जामीन मंजूर

सोलापूर – मोहोळ येथील शेतकरी मोहन दत्तात्रय आदमाने यांचा १४ मार्च २०२२ रोजी आर.टी.ओ. अधिकारी यांच्या आतताई पणामुळे मृत्यू झाला, या कारणावरुन अधिकाऱ्यावर हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण करुन जखमी केल्या प्रकरणातील चेतन मोहन आदमाने याच्या अटकपूर्व जामिन अर्जास जिल्हा व सत्र न्यायाधिश मिलिंद भोसले यांनी मंजूरी दिली.

 

शिरापूर येथील शेतकरी मोहन आदमाने हे त्यांचे मोटार सायकलवरून मोहोळकडून शिरापूर येथे निघाले होते. त्यावेळी सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरच्या दिशेने एक कंनटेनर निघाला होता. त्याच्या पाठीमागे असलेल्या आर.टी.ओ. विभागाच्या वाहनातील अधिका-यांनी कंटेनरला ओव्हरटेक करीत गाडी आडवी घालून चालकाला कंटेनर अचानक उभा करण्यास भाग पाडले.

अशाप्रकारे अचानक आर.टी.ओ ची गाडी आडवी आल्याने तो कंटेनर जागीच थांबला होता. त्यावेळी पाठिमागून मोहन आदमाने हे अचानक थांबलेल्या कंटेनरला धडकुन जागीच ठार झाले होते. त्यावेळी त्याठिकाणी बरेच गावकरी हजर होते. त्यांनी आर.टी.ओ. अधिकाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळेच प्रगतशील शेतकऱ्याचा मृत्यू झाला ही बाब लक्षात घेवून त्यांनी सदर आर.टी.ओ. अधिकाऱ्यांची गाडी फोडून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती.

या घटनेची फिर्याद वाहन निरीक्षक शिवाजी सोनटक्के यांनी मोहोळ पोलीसात दिली होती. त्याप्रमाणे पोलीसांनी मयताचा मुलगा चेतन आदमाने याचेविरुध्द गुन्हा दाखल केला होता. अटक टाळण्यासाठी आरोपी चेतन आदमाने याने न्यायालयात जामिन मिळण्यासाठी अॅड. शशि कुलकर्णी यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता.  चेतन आदमाने हे वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यामध्ये होते. त्यामुळे ते असे कृत्य करणे शक्य नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे.

वर्तमान पत्रातील बातम्यावरून असे लक्षात येते की, सदर हल्ल्यामागे चेतन आदमाने याचा कोणताही संबंध नाही. आरोपी हा पोलीस तपासात सहकार्य करण्यास तयार आहे . असा युक्तीवाद मांडला होता. सदरचा युक्तीवाद विचारात घेवून न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. विनोद सुरवसे, अॅड. स्वप्निल सरवदे, अॅड. रणजित चौधरी, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. आशुतोष पुरवंत तर सरकारपक्षातर्फे अॅड. गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले.

 

Tags: #two-wheeler #driver #killed #collision #pickup #truck #TireRoad #Solapur#सोलापूर #ति-हे #रोडवर #पिकअप #धडक #दुचाकी #चालक #ठार #देगांव #सोलापूर
Previous Post

पंढरपुरातील सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

Next Post

माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर, पण बाहेर येण्यास लागणार वेळ

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर, पण बाहेर येण्यास लागणार वेळ

माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर, पण बाहेर येण्यास लागणार वेळ

वार्ता संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697