● ऊस तोडणी वाहतुकीसाठी परस्पर कर्ज काढले
पंढरपूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी म्हणून बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर मध्ये सहा लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केली आहे. माझ्या नावे परस्पर उचलले आहे. Cooperative Shiromani Vasantrao Kale of Pandharpur Cooperative Sugar Factory Frauding Farmers ते कर्ज फेडावे आणि चेअरमन कल्याणराव काळे आणि तत्कालीन कार्यकारी अधिकारी माणिकराव जगताप यांच्यासह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगार बब्रुवान सोनवले यांनी केली आहे. अन्यथा 20 मार्च 2023 पासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बब्रुवान सोनवले हे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे ऊस वाहतुकीसाठी कोणतेही वाहन नाही, त्यामुळे ऊस तोडणी वाहतुकीचा करार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु त्यांच्या नावावर पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया या शाखेत सन 2017- 18 च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी म्हणून 15 फेब्रुवारी 2018 रोजी सहा लाख रुपयाचे कर्ज काढले आहे, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बब्रुवान सोनवले यांची फसवणूक करणारे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, तत्कालीन कार्यकारी अधिकारी माणिकराव जगताप, किसन जगदाळे, कैलास कदम, बबन सोनवले आणि काझी यांनी माझ्या नावावर परस्पर कर्ज उचलले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि माझे कर्ज फेडावे अन्यथा मी 20 मार्च 2022 पासून पंढरपूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचे माहिती यांनी दिली आहे.
यासंदर्भात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आणि कार्यकारी संचालक झुंझार आसबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे मोबाईल फोन बंद लागत आहेत. त्यामुळे कारखान्याची बाजू समजू शकली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 बायकोला नांदायला मेव्हण्यावर चाकू हल्ला
सोलापूर : तू माझ्या बायकोला नांदावयास का पाठवत नाही म्हणून मेहुण्यास चाकूने गळ्यावर वार केले. नाकाचा शेंडा चाकूने कापून जखमी केल्याची फिर्याद मोहोळ पोलिसांत दाखल करण्यात आली. रेवणसिद्ध गोकुळ होनमाने (वय ४०, रा. कुंभार खाणी, मोहोळ) असे जखमीचे नाव आहे.
मोहोळ शहरातील चौमुखी मारुती येथे राहणारा नितीन ब्रह्मदेव सोनटक्के याचे रेवणसिद्ध गोकुळ
होनमाने याच्या बहिणीबरोबर लग्न झालेले आहे. त्याला एक मुलगा व दोन मुली आहेत.
घरगुती भांडणातून मेहुण्यास गोड बोलून दुसरीकडे नेऊन चाकू आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना चंद्रमौळी ता.मोहोळ) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
रेवणसिद्ध गोकुळ व्हनमाने (वय २६ रा. कुंभारखणी, मोहोळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून नवनाथ (भाऊ) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले . रेवणसिद्ध व्हनमाने हा काल घरात बसला होता. त्याचा भाऊजी नितीन सोनटक्के (रा.नागनाथनगर मोहोळ) याने त्याला घरगुती भांडणातून गोड बोलत चंद्रमौळी येथे नेले . त्यानंतर नितीन व त्याच्या एक साथीदार असे दोघांनी त्याला चाकू आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.