मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अनिक्षा नावाच्या डिझायनर महिलेविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वडिलांसंदर्भात सुरू असलेल्या एका खटल्यात शिथिलता आणण्यासाठी अनिक्षाने ही ऑफर दिल्याचे समजते. Bribe offer to Amrita Fadnavis; Aniksha designer Sattebaz accused of setting a trap to bring trouble
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानभवनात प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला अडचणीत आणण्यासाठी हा ट्रॅप होता. त्या मुलीने दिलेल्या हिंटप्रमाणे मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्या व्यक्तीचे संभाषण आहे’, असे फडणवीस म्हणाले.
धमकावल्याप्रकरणी अनिक्षा ताब्यात घेतलय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणी तसेच ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानी हिला ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील उल्हासनगर भागातून तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तिची पोलीस सध्या चौकशी करत आहेत. अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच घेण्यासाठी धमकावण्यात आले होते.
मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीसांनी २० फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडीलांविरोधात कलम १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.
My statement in Legislative Assembly on the news published in ‘Indian Express’ and on the question raised by LoP Ajitdada Pawar..
'इंडियन एक्सप्रेस' या दैनिकात प्रकाशित वृत्तासंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर विधानसभेत केलेले निवेदन…… pic.twitter.com/D5QLJJRBgI— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 16, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, “अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितलं की, ती कपडे, दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली,” असं अमृता फडणवीसांनी सांगितलं.
“२७ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवलं. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसं कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अनिक्षाला कारमधून खाली उतरवलं,” असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत नोंद केलं.
“१६ फेब्रुवारीला रात्री ९.३० च्या दरम्यान अनिक्षाने फोन केला. तेव्हा सांगितलं की, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोप करण्यात आलं आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची तयारी आहे. हे ऐकताच फोन कट करत तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर १८ फेब्रुवारीला रात्री ११.५५ ते १२.१५ च्या दरम्यान २२ व्हिडीओ क्लीप, तीन व्हॉईस नोटस अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आले, १९ फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांच्या मोबाईल क्रमाकांवर ४० मेसेज, व्हिडीओ, व्हॉईस नोट्स आणि स्क्रीन शॉट्स पाठवण्यात आले. हा नंबर अनिक्षाच्या वडिलांचा असल्याची माहिती मिळाली,” असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी उल्हासनगर येथून अनिक्षा जयसिंगानी हिला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या अनिक्षा हिची चौकशी केली जात आहे. डिझायनरच्या वडिलांनी अमृता फडणवीस यांनाही कटात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनूसार अनिक्षा तिच्या वडिलांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली. यानंतर फडणवीस यांनी अनिक्षाचा नंबर ब्लॉक केल्यावर तिने दुसऱ्या नंबरवरून मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून धमकाविल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. डिझायनर अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी उल्हासनगर येथून अनिक्षा जयसिंघानी ताब्यात घेतले आहे.