सोलापूर : फक्त एकाच जिल्ह्यासाठी असणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ म्हणजे सोलापूरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. या विद्यापीठातील भ्रष्टाचारावर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडत विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा पाढा सभागृहात वाचला आहे. MLAs focus on university corruption; The Vice-Chancellor will be investigated. On the verge of retirement, Solapur Punyashlok Ahilya Devi Holkar त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. परिणामी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कुलगुरूंना आता चौकशीला तोंड द्यावे लागणार आहे.
कोविड काळातील ऑनलाईन पेपर तपासणी, क्रीडा स्पर्धेतील घोटाळा आणि कुलगुरूंकडून होणारा अधिकारांचा गैरवापर यावर माळशिरसचे भाजप राम सातपुते यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली. पेपर तपासणीतील भ्रष्टाचाराचा आकडा कोट्यवधींवर गेल्यामुळे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाला खुलासा करण्याचा आदेश दिला होता. हा खुलासाही अमान्य झाल्यामुळे उच्च पदस्थ अधिका-यांमार्फत स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.
□ पेपर तपासणीत केला घोळ
कोविडच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या. या परीक्षेतील पेपर तपासणीचे कंत्राट कुलगुरूंनी एका कंपनीला दिले. राज्यातील इतर विद्यापीठात ऑनलाईन पेपर तपासणीचा दर हा प्रती पेपर ८ ते १२ रुपये असताना कुलगुरूंनी प्रती पेपर ३५ रुपये दर दिला. याशिवाय विद्यापीठाने घेतलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतही गैरव्यवहार झाला असून विद्यापीठ कँटिनच्या कंत्राटातही घोटाळा असल्याचा आरोप आ. सातपुते यांनी केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● ५ वर्षात ४० कोटींचा भ्रष्टाचार : आ. सातपुते
सोलापूर विद्यापीठात दरवर्षी ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. एका वर्षाला ८ कोटी म्हणजे पाच वर्षाला ४० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आ. सातपुते यांनी केला आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून माध्यमांकडे कोणताही खुलासा करण्यात आला नाही. याबाबत कुलगुरूंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे कुलगुरूंची बाजू समजू शकलेली नाही.
● देवळाणकर करणार चौकशी
दरम्यान, आ. सातपुते यांच्या लक्षवेधीनंतर उच्च शिक्षणमंत्र्यांनी विद्यापीठाकडून खुलासा मागवला. मात्र विद्यापीठाचा खुलासा आ. सातपुते यांचे समाधान करणार नव्हता. त्यामुळे त्यांनी हा विषय सभागृहात ताणून धरला. शेवटी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती कुलगुरूंची चौकशी करेल, अशी माहिती सभागृहात दिली.
● दोषी आढळल्यास निवृत्तीचे लाभ रोखणार
दरम्यान, कुलगुरू फडणवीस ह्या दि. ५ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तत्पूर्वी देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती कुलगुरू फडणवीस यांची चौकशी करेल आणि दि. ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करेल. या अहवालात कुलगुरू दोषी आढळल्यास त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ रोखण्यात येतील, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कुलगुरूंना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.