□ जिल्ह्यात एकूण 3469 हेक्टर तर पंढरपूर तालुक्यात 1800 हेक्टर पेक्षा अधिक पिकांचे अवकाळी पाऊसाने नुकसान
सोलापूर / पंढरपूर – अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा, व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पंढरपूरचे आजी माजी आमदार अधिकाऱ्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले. व
नियम, निकष बाजूला ठेवून पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी आज दिल्या आहेत. Grandmother on farmer’s dam with former MLA officer to help the victims; Panchnama started Pandharpur Mangalvedha Solapur Sahadhan Awatade Prashant Paricharak
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील लेंगरे वस्ती, मस्के वस्ती तसेच मुंडेवाडी व कोंढारकी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, आंबा, गहू आदि पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका कृषि अधिकारी भागवत सरडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यात साडेबाराशे हेक्टर फळपिकांचे तर गहू, हरभरा, मका या इतर पिकांचे असे मिळून एकूण 1800 हेक्टर पिकांचे शनिवारी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ.समाधान अवताडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत शेतशिवाराला भेट देवून पाहणी केली. अवकाळी पाऊस व गारपिटीने हातातोंडाशी आलेले आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून तात्काळ मदतीची मागणी करण्यात येईल, असेही आ.आवताडे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांचे तात्काळ पंचनामे सुरु करण्यात आले असून, नुकसानग्रस्त पिकांचा अहवाल शासनास लवकरात लवकर शासनास सादर करण्यात येईल, असे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपकरी कर्मचारी हे पंचनामा करण्यासाठी कर्तव्यावर हजर झाले असल्याचेही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपीट व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 3 हजार 469 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 4 हजार 500 शेतकरी हे बाधित झाले आहेत. अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष आंबा, पपई, टरबूज, कलिंगड अशा फळबागांचे तर ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे कृषि विभागाकडून सुरू करण्यात आले आल्याचे बाळासाहेब शिंदे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ) यांनी सांगितले.
○ नियम, निकष बाजूला ठेवून पंचनामे करा – प्रशांत परिचारक
अवकाळी पाऊस व गारपीटमुळे पंढरपूर तालुक्यातील 3000 हून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला असून सर्व नियम निकष बाजूला ठेवून याचे पंचनामे करण्याची सूचना प्रशासनास केली. शेतकरी आपल्या कुटुंबाप्रमाणे पिकाला जपतो. मात्र ज्यावेळी हातात काही पैसे पडण्याची वेळ येते, त्यावेळी नैसर्गिक संकटामुळे सर्व काही वाहून जाते. शनिवारी झालेल्या पाऊस व गारपिट मुळे हजारो शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना यामधून आधार द्यावा यासाठी आपण शासन दरबारी हा विषय लावून धरणार आहे.अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना पिकांची नोंद आहे का ? किंवा इतर नियमावर बोट न ठेवता सरसकट जागेवर कोणते पीक आहे किती नुकसान झाले आहे याचे तातडीने पंचनामा करावेत, अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.
○ नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा – आमदार समाधान आवाताडे
पंढरपूर :- अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी आज दिल्या. पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील लेंगरे वस्ती, मस्के वस्ती तसेच मुंडेवाडी व कोंढारकी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, आंबा, गहू आदि पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका कृषि अधिकारी भागवत सरडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यात साडेबाराशे हेक्टर फळपिकांचे तर गहू, हरभरा, मका या इतर पिकांचे असे मिळून एकूण 1800 हेक्टर पिकांचे शनिवारी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आमदार समाधान अवताडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत शेतशिवाराला भेट देवून पाहणी केली. अवकाळी पाऊस व गारपिटीने हातातोंडाशी आलेले आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून तात्काळ मदतीची मागणी करण्यात येईल, असेही आमदार आवताडे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांचे तात्काळ पंचनामे सुरु करण्यात आले असून, नुकसानग्रस्त पिकांचा अहवाल शासनास लवकरात लवकर शासनास सादर करण्यात येईल, असे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपकरी कर्मचारी हे पंचनामा करण्यासाठी कर्तव्यावर हजर झाले असल्याचेही गुरव यांनी सांगितले. तसेच पंढरपूर तालुक्यातील गारपीट झालेल्या ठिकाणची पाहणी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांनी देखील केली.