पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिवार देवता पैकी एक असणाऱ्या श्री अंबाबाई देवी मंदिरातील पितळेच्या पादुका चोरून नेणाऱ्या चोरट्यास समितीच्या पुजाऱ्याने पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले. Pandharpur. Jailed Solapur criminal who stole the goddess’s shoes due to the courage of the priest
याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील बाळू मच्छिंद्र खाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती अशी की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत 28 परिवार देवता असून यापैकी चंद्रभागेच्या काठावर अंबाबाई देवीचे मंदिर आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे येथील पुजारी महेश दिलीप मंजरतकर हा सकाळी पूजा केल्यानंतर मंदिरातील परिसराची स्वच्छता करीत असताना देवीच्या समोरील पाच किलो वजनाच्या दर्शनासाठी ठेवलेल्या पितळी पादुका नसल्याचे त्याच्या लक्षात आले. सदर पादुकांचा शोध घेत असताना मंदिराच्या दरवाज्यातून एक व्यक्ती पळून जाताना मंजरतकर याने पाहिले. संशय आल्यामुळे त्याने सदर व्यक्तीचा पाठलाग करून त्यास महाद्वार येथे पकडले. सदर चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंदिर समिती पुजाऱ्याने दाखविलेल्या धाडसामुळे सदर चोरटा जेरबंद झाला.
○ लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरातील आटा चक्कीला आग
सोलापूर : बेगमपेठ येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरातील आटा चक्कीला शनिवारी रात्री आग लागली.याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान,त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत आग लगेच विझवली.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाचे केदार अवटे यांनी दिली.यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ हॅण्डल लॉक असलेली दुचाकी घरासमोरुन केली लंपास
सोलापूर : घरासमोर हॅण्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एम.एम.१३. डी.एच. ६८३४ ही अज्ञात चोरट्याने दि.१७ मार्च रोजी दुपारी एक ते सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान भावनाऋषी हॉस्पिटल फुलारी अपार्टमेंट न्यू पाच्छा पेठ येथे घडली.
याप्रकरणी विजय आप्पाराव सालवे (वय-५५, रा.भावनाऋषी हॉस्पिटल, फुलारी अपार्टमेंट) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार अवचारे हे करीत आहेत.
● लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ ; पतीसह चौघांवर गुन्हा
सोलापूर : तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही व योग्य मानपान केला नाही तसेच तुझ्या वडिलांनी दोन तोळे सोने दिले नाही असे म्हणत चार तोळे सोने व चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला घरात उपाशी कोंडून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सन २०१४ ते ५ ऑगस्ट या कालावधी दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी घडली. याप्रकरणी नेहा प्रज्योतीपती वास्टर (वय-२७,रा.रविवार पेठ) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती प्रज्योतीपती यादगीरराव वास्टर, दीर बलभीम यादगीरराव वास्टर, सासरे यादगीरराव विश्वनाथ वास्टर व नणंद वंदना सुनील भालेराव (सर्व.रा.जोशी वाडा, हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोसई मोतेकर हे करीत आहेत.